एरंडोल येथे मारुती ची महाआरती, भाविकांची मोठी उपस्थिती.

प्रतिनिधी (कुंदन सिंह ठाकुर)
एरंडोल :- येथील पांडवनगरी उत्सव समितीच्यावतीने पांडववाड्याजवळ असलेल्या हनुमान मंदिरासमोर भाविकांच्या मोठी उपस्थितीत महाआरती करण्यात आली. महाआरतीस युवक व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. महाआरती शांततेत पार पडली. पांडवनगरी उत्सव समितीच्यावतीने शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
पांडव वाड्यासमोर असलेल्या मारुती मंदिरासमोर उत्सव समितीच्यावतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार रात्री आठ वाजे चा सुमारास पदाधिकारी आणि महिला लोकप्रतिनिधी यांच्याहस्ते महाआरती करण्यात आली होती. महाआरतीमध्ये भाविक सहभागी झाले होते. यामध्ये महिला आणि युवकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.
यावेळी माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, रमेश परदेशी, राजेंद्र चौधरी, रमेश महाजन, माजी नगरसेवक जगदीश ठाकूर, सतीश परदेशी, डॉ. नरेंद्र पाटील, अँड महेश काबरा, अँड ज्ञानेश्वर महाजन, अँड अजिंक्य काळे, अँड आकाश महाजन, अँड दिपेश पांडे,कुणाल महाजन, आर डी पाटील, निलेश परदेशी,प्रकाश पाटील , अमोल जाधव, रविन्द्र महाजन, विजय महाजन,माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, आरती ठाकुर, रश्मी दंडवते,शोभा साळी,गौरी मआनउनधए, क्षमा साळी, नैना गुजर आदी महिला ची उपस्थित होती, पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे, उपनिरीक्षक शरद बागल यांनी पोलीस आणि गृहरक्षक दलाचा बंदोबस्त चोख ठेवला होता.