राष्ट्रवादीचा संस्थापक कोण, हे सर्वांना ठाऊक – शरद पवार

24 प्राईम न्यूज 2 Oct 2023
महाराष्ट्रात आणि राज्याबाहेरसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक कोण आहे, ते सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे लोकांची भावना ही आमच्यासाठी अनुकूल आहे, असे आमचे लोक सांगतात त्यात तथ्य आहे, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी जुन्नरमध्ये केले. कोणी वेगळी भूमिका घेतली असेल तर तो त्यांचा लोकशाहीमधील अधिकार आहे. त्यावर मी भाष्य करू इच्छित नाही, असे सांगत शरद पवार यांनी अजित पवार गटाला टोला लगावला.
अध्यक्ष असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. यादरम्यान अजित पवार परिषदेमध्ये याप्रकरणी भाष्य केले. शरद पवार म्हणाले की, “मी गटाला टोला
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार की अजित पवार, यावरून पक्षातील दोन गटांत वाद सुरू आहेत. अजित पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जुन्नरमध्ये झालेल्या पत्रकार महाराष्ट्रात फिरतोय. सर्वसामान्य लोकांमध्ये स्वच्छ कल्पना आहे. सामान्य लोक काय विचार करतो हे महत्त्वाचे आहे. शनिवारी किल्लारीत आमच्या सभेला २० हजार लोक होते. राज्यात सगळीकडे हे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादीचा संस्थापक कोण आहे हे लोकांना माहिती आहे.”