कुठेतरी आपले चुकतंय याचा आपण निश्चित विचार केला पाहिजे. राज ठाकरे.

24 प्राईम न्यूज 2 Oct 2023 नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीत डीजे- डॉल्बीचा आवाज असह्य झाल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या डीजेंच्या आवाजावरून समाजाचे कान टोचले आहेत. डीजे होर्डिंग्ज आदी बाबी पाहता कुठेतरी आपले चुकतंय याचा आपण निश्चित विचार केला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त
केले आहे. याबाबत सार्वजनिक मंडळांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार असल्याचे राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे उत्सव आणि आनंद साजरा व्हायलाच पाहिजे, पण माफक प्रमाणात पारंपरिक ढोल-ताशा पथक, लेझीम अशा पद्धतीने मिरवणूक जर आपण काढली तर त्याचं पावित्र्य टिकेल, आनंद द्विगुणित होईल आणि हे बघायला जगभरातून लोक पण येतील. मी लवकरच सार्वजनिक मंडळांच्या प्रमुखांशी बोलणार आहेच. पण एकूण सरकारने आणि राजकीय पक्षांनी मतांच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन यावर विचार आणि कृती करायला हवी, असे राज ठाकरे म्हणाले.