एरंडोल नगरपरिषद तर्फे स्वच्छ भारत अभयानांतर्गत शहरात विवीध विभागांमध्ये १ तास श्रमदान मोहीम राबविण्यात आली ..

0

एरंडोल (कुंदन ठाकुर)एरंडोल नगरपरिषद तर्फे स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार यांनी दि. 15 सप्टेंबर 2023 चे 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्यात आले त्याचाच भाग म्हणून स्वच्छता ही सेवा अंतर्गत 1 ऑक्टोबर रोजी 1 तास श्रमदान मोहीम राबविण्यात आली.
मा.मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री विकास नवाळे यांच्या निर्देशानुसार एरंडोल शहरात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत स्वतः मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री विकास नवाळे यांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला. तसेच सर्व नगरपरिषदेचे कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी आणि सफाई कर्मचारी यांनी सर्वांनी श्रमदान करून आपला सहभाग नोंदवला.
तसेच शहरातील विविध संस्था जसे की, डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांचे श्री सदस्य, इंजिनिअर्स असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, महिला बचत गट आणि शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय यांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला. या श्रमदानातून जवळपास 9 टन कचरा गोळा करून पुढील प्रक्रियेसाठी घनकचरा प्रकल्प केंद्रावर पाठविण्यात आला.
श्रमदानाची सांगता एकचक्रनगरी सार्वजनिक उद्यानात स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाची शपथ घेऊन करण्यात आली. या वेळी जवळपास 1000 नागरिक यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!