सरस्वतीबाई माध्यमिक विद्यालय,पाडसे येथील उपक्रमशील शिक्षक श्री भरत रामदास कोळी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार..

अमळनेर (प्रतिनिधि)सरस्वतीबाई माध्यमिक विद्यालय,पाडसे येथील उपक्रमशील शिक्षक श्री भरत रामदास कोळी यांना नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरम तर्फे भारत सरकार कडून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे पाडसे येथील सरस्वतीबाई माध्यमिक विद्यालयात नाविन्यपूर्ण उपक्रम शैक्षणिक सेवा व विविध उपक्रमात कायम विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन करणारे शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणारे शिक्षणासह सामाजिक व सांस्कृतिक कार्यात सतत अग्रेसर असणारे श्री भरत रामदास कोळी सर यांच्या कार्याची दखल घेत नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरमने त्यांची आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करून त्यांचा सन्मान केला दिनांक 01 ऑक्टोबर रविवार रोजी धुळे येथील अजय लॉन्स नगाव बारी धुळे येथे पुरस्काराचे वितरण नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष गोरख देवरे व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रफुल्ल सिताराम पाटील यांच्या शुभहस्ते या पुरस्काराचे वितरण झाले आहे या कार्यक्रमाला कर्नल गणपती श्रीनिवासन माननीय आमदार बाबासो कुणाल पाटील भाऊसाहेब शिवाजी अकलाडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे, प्रमोद पाटील हे प्रमुख अतिथी उपस्थित होते श्री अशोक पाटील व श्री भास्कर पाटील हे कार्यक्रमाचे आयोजक होते.प्रभारी मुख्याध्यापक श्री बी.आर. कोळी सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री शरद दयाराम शिंदे व सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.