महाराष्ट्राला दिशा देणारे साहित्य संमेलन येथे होईल अशी आशा वाटते – मंत्री अनिल पाटील
९७ व्या साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण प्रसंगी..

0


अमळनेर (प्रतिनिधि)
महाराष्ट्राला दिशा देणारे साहित्य संमेलन येथे होईल अशी आशा वाटते असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी
९७ व्या साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण प्रसंगी केले.
येथील प्रताप मिल कंपाउंड मधील बन्सीलाल पॅलेस मध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विजय माहेश्वरी, माजी आमदार स्मिता वाघ, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, खा. शि. मंडळ कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, बोधचिन्ह निर्माते  प्राचार्य मिलिंद भामरे आदी उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर बोधचिन्ह साकारणारे प्राचार्य मिलिंद भामरे यांनी बोधचिन्हाबाबत थोडक्यात माहिती दिली. व मी अमळनेरचा आहे माझ्याकडून परमेश्वराने ही सेवा करून घेतली असे सांगितले.
यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार स्मिता वाघ, यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोधचिन्हाचे उद्घाटक कुलगुरू डॉ विजय माहेश्वरी यांनी
तब्बल ७२ वर्षानंतर साहित्य संमेलन आत्मीयतेचा विषय आहे. समर्पक बोधचिन्ह उपलब्ध करून दिले. अमळनेर सांस्कृतिक राजधानी आहे. संत सखाराम महाराज यांची पुण्यभूमी, सानेगुरुजी कर्मभूमी, प्रताप शेठ व हशीम प्रेमजी यांची उद्योगभूमी शाळेची पायरी देखील न चढणाऱ्या बहिणाबाईंचे नाव विद्यापीठाला  दिले हे जगातली अद्भुत घटना आहे. बहिणाबाईंनी आपल्या कवितांमधून  जीवनाचे तत्वज्ञान मांडले आहे. मातृभाषेतून शिक्षण परिपक्व करते. मातृभाषेचे खूप महत्व आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून पाच अभ्यासक्रम इंग्रजी आणि मराठी भाषेत उपलब्ध केले आहेत. मराठी साहित्य संमेलन श्वास आहे. खान्देशसाठी अभिमानाची बाब आहे.
यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलतांना मंत्री अनिल पाटील म्हणाले की  प्रत्येकाला आवडीचा अभिमान असला पाहिजे. बोधचिन्ह भूमीपुत्राने करून दाखवले याचा माझ्यासारख्या भूमीपुत्राला अभिमान आहे. अतिशय उत्कृष्ठ बोधचिन्ह तयार केले. बोधचिन्हाच्या माध्यमातून जगाच्या व्यासपीठावर खान्देशची प्रतिमा दडवली आहे. हे  बोधचिन्ह जगात नावलौकिक करेल अशी प्रत्येक गोष्ट घेतली आहे. मराठी माणसाचा म, प्रमुख पीक केळीची पाने, प्रतिपंढरपूर संत सखाराम महाराज समाधी,  जात्याच्या स्वरूपात बहिणाबाई  व जळगाव जिल्ह्याचे आठवण ठेवली आहे. अमळनेर सारख्या छोट्या गावात अमळनेर ला १९५२ साली साहित्य संमेलन झाले. प्रताप कॉलेज, प्रताप शेटजींनी पूर्वजांनी तत्वज्ञान मंदिराच्या माध्यमातून जगात प्रसिद्ध आहे.  सानेगुरुजींची चळवळ येथून झाली याचा सर्व अभ्यास करून येथे साहित्य संमेलनसाठी परवानगी दिली. महाराष्ट्राला दिशा देणारे साहित्य येथे होईल अशी आशा वाटते. भरणारे साहित्य संमेलन प्रत्येकाने यशस्वी करून दाखवावे. तालुक्याचा आदर्श व्हावा यासाठी जबाबदारी पार पाडा. पुढील पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल असे संमेलन पार पाडा. असे यावेळी सांगितले.  यावेळी नरेंद्र निकुंभ,शरद सोनवणे, शामकांत भदाणे,रमेश पवार, सोमनाथ ब्रम्हे, प्रदीप साळवी, पी.बी.भराटे,  बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, शाम पवार, शिला पाटील, रजनीताई केले, साहित्यिक कृष्णा पाटील, शरद धनगर, रेखा पाटील, सुनिता पाटील, सुभाष पाटील घोडगावकर, हिरामण कंखरे, शाम अहिरे, मनोज पाटील, गोकुळ बोरसे,भागवत सूर्यवंशी, सुलोचना वाघ, नयना पाटील, माधुरी पाटील, विनोद पाटील, प्रदीप अग्रवाल,विद्या हजारे, ब्रह्मकुमारी विद्यादेवी, डॉ.रामलाल पाटील, पूनम साळुंखे, डॉ.चंद्रकांत पाटील, हरि भिका वाणी, बजरंग अग्रवाल,नीरज अग्रवाल आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी वाङमय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी यांनी केले तर सूत्रसंचालन शरद सोनवणे व आभार नरेंद्र निकुंभ यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!