इसिसच्या तीन दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक !

0

24 प्राईम न्यूज 3 Oct 2023

इस्लामिक स्टेटच्या एका संशयित दहशतवाद्याला आणि इतर दोन संशयितांना सोमवारी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. इसिस दहशतवादी मोहम्मद शाहनवाज उर्फ शफी उज्जामा हा राष्ट्रीय तपास संस्थेच्या एनआयए पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात मोस्ट वॉन्टेड यादीत होता. त्याला पकडण्यासाठी ३ लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते.

दिल्लीतील इसिस मॉड्युल दिल्लीसह उत्तर भारतात दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखत होते. दरम्यान, हे मॉड्युल एका गुप्त माहितीतून उघड झाल्यानंतर पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या. शाहनवाज हा व्यवसायाने इंजिनिअर असून तो पुणे आयएसआयएस मॉड्युल प्रकरणात वॉन्टेड होता. तो दिल्लीचा रहिवासी असून पुणे पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला होता. पुणे पोलिसांच्या ताब्यातून पळाल्यानंतर तो दिल्लीत लपून बसला होता. शाहनवाजसह अटक झालेल्या तिन्ही संशयित दहशतवाद्यांची सध्या चौकशी सुरू आहे. या कारवाईदरम्यान बरेच साहित्य जप्त करण्यात आले असून यामध्ये रासायनिक द्रव्यांचा समावेश होता. या रासायनिक द्रव्यांचा इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (आयईडी) अर्थात गावठी बॉम्ब बनवण्यासाठी केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!