पत्रकारांवर छापे चीनकडून निधी मिळाल्याचा आरोप
‘संपादकासह एचआर प्रमुखाला अटक.

24 प्राईम न्यूज 4 Oct 2023 आर्थिक निधी मिळवून चीनच्या धोरणांचा प्रचार करण्याचा आरोप असलेल्या ‘न्यूजक्लिक’ या न्यूज पोर्टलवर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी छापे टाकले. कंपनीची कार्यालये तसेच पत्रकारांची निवासस्थाने अशा ३० ठिकाणी पोलिसांनी हे छापे टाकले व ‘न्यूजक्लिक’चे दिल्लीतील कार्यालय सील केले. चौकशीनंतर कंपनीचे संस्थापक व मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ यांना परदेशी वित्तपुरवठा प्रकरणी अटक करण्यात आली. तसेच कंपनीचे अधिकारी अमित चक्रवर्ती यांनाही अटक करण्यात आली.
दिल्ली पोलिसांच्या पथकांनी सकाळी साडेसहापासून सव्वाआठपर्यंत दिल्ली, नोएडा, गाझियाबाद भागातील ‘न्यूजक्लिक’च्या पत्रकारांची घरे गाठून एकाच वेळी छापे टाकण्यास सुरुवात केली. दिल्ली पोलिसांच्या पथकांकडून ‘न्यूजक्लिक’साठी काम करणाऱ्या नऊ पत्रकारांच्या घरांवर छापे टाकले