कही” खुशी” कही “गम” पालकमंत्री पद मिळवून अजिदादांची शिंदे गटावर मात नंदुरबारचे पालकमंत्री पद ना अनिल पाटील यांच्या कडे.

24 प्राईम न्यूज 5 Oct 2023
मागील अनेक दिवसांपासून पालकमंत्रिपदाच्या वाटपाची चर्चा सुरू होती. सरकारमध्ये अजित पवार गटाचा सहभाग झाल्यानंतर या पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात संघर्षही सुरू असल्याचं बघायला मिळालं. या पार्श्वभूमीवर

अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी बुधवारी (४ ऑक्टोबर) जाहीर झाली पालक मंत्रिपद वितरणाने अजित पवार गटात “खुशी” असली तरी पालक मंत्रिपद वितरणातही काहीच न मिळाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेत “गम” आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडून शिंदे गटानंतर सत्तेत सहभागी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालक मंत्रिपद वाटपावरून नाराजीचा सूर लावत पुन्हा एकदा शिंदे गटावर मात करून अपेक्षेप्रमाणे पालक मंत्रिपद आपल्या पदरात पाडून घेतले आहे. अजित पवारांच्या नाराजीच्या मुद्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी दिल्लीत जाऊन आले आणि बुधवारी लगेचच राज्यातील सुधारित पालक मंत्रिपदाची घोषणा करण्यात आली. यात अजित पवार गटातील ७ मंत्र्यांना पालक मंत्रिपदाचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे अजित पवार यांना पुण्याचे पालक मंत्रिपद हवे होते. त्यांची तीही अपेक्षा पूर्ण झाली तसेच नंदूरबारचे पालक मंत्री भाजप नेते विजयकुमार गावित यांचीही उचलबांगडी करण्यात आली असून तेथे अजित पवार गटाचे अनिल पाटील यांच्याकडे पालक मंत्रिपद देण्यात आले.