बस थांबेना….. विद्यार्थ्यांच्या संतापाचा उद्रेक, रस्ताअडवत आंदोलन..

अमळनेर ( प्रतिनिधि )तालुक्यातील मंगरूळ येथे एस टी बस थांबत नसल्याने शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत

यांची नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!
आहे. शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगरूळ येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. पाऊण तास वाहतूक खोळम्बली होती.
मंगरूळ येथून दररोज अमळनेर येथे शाळा ,महाविद्यालयात अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी ये जा करतात. तसेच नवलनगर व धुळे येथे देखील विद्यार्थी शिक्षणासाठी जात असतात. मात्र वारंवार मागण्या ,निवेदने देऊनही एस टी बसेस थांबत नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. चार दिवसांपूर्वी आगार व्यवस्थापकांनी एक विशेष व्यक्ती तेथे ठेवून देखील बस थांबत नसल्याने विद्यार्थी व पालकात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या. अखेरीस शिवसेना तालुका प्रमुख श्रीकांत पाटील , राष्ट्रीय किसान मोर्चाचे उपाध्यक्ष हिरालाल पाटील , अरुण घोलप ,राजेंद्र पाटील , प्रमोद पाटील , मिलिंद पाटील , गोरख पाटील , रतीलाल पाटील , विश्वास पाटील , चंद्रशेखर पाटील , अनिल पाटील ,धनंजय पाटील , तुषार पाटील , गणेश पाटील , हेमंत पाटील , विशाल पाटील , शरद गढरी ,दगडू पंडीत , समाधान पाटील , दीपक भदाणे , भटू पाटील , गुलाब पाटील , शुभम ठाकरे , धनराज पाटील , दीपक टेलर यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थिनी आंदोलनात सहभागी झाले होते.
सुमारे पाऊणतास वाहतूक खोळम्बली होती. दोन्ही बाजूला एक किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आगार व्यवस्थापकांना बोलावल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने अखेरीस पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे यांनी आगार व्यवस्थापक इम्रानखान पठाण याना बोलावले. आज पासून पुन्हा एक कर्मचारी मंगरूळ स्टॉप वर थांबवतो. तसेच विद्यार्थी किंवा पालकांनी बस न थांबवणाऱ्या एस टी चा नंबर आणि वेळ यासह तक्रार केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. असे आश्वासन पठाण यांनी श्रीकांत पाटील यांच्याशी चर्चा केल्यानन्तर आंदोलन मागे घेण्यात आले. त्याच ठिकाणी अडवण्यात आलेल्या बस मध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनीना बसवून शाळा कॉलेजला रवाना करण्यात आले.
तीन चार दिवसांपूर्वी पिंपळे येथे देखील एस टी थांबत नसल्याने विद्यार्थ्यांनी रस्ता रोको केला होता. त्याचप्रमाणे नगाव खुर्द ,नगाव बुद्रुक , गडखांब येथील ग्रामस्थ व ग्रामपंचायतींनी देखील एस टी प्रशासनाला निवेदन देऊन बसेस थांबवण्याची विनंती केली आहे.
आंदोलनाचे परिणाम म्हणून चालक अशपाक शाह याना मंगरूळ येथे कर्तव्यावर नेमून विद्यार्थ्यांसाठी एस टी थांबवण्यास सांगण्यात आले.