रु.१०० व रु.५००/- चे मुद्रांक चलनातून बाद न करता मुद्रांक छपाई सुरु ठेवां तसेच १९०० कोटी रुपयांचे मुद्रांक पेपर नष्ट करण्याच्या निर्णयाला मंत्रीमंडळ स्तरावर स्थगीती द्या.मुद्रांक विक्रेत्यांचे मंत्री अनिल पाटील यांना निवेदन

अमळनेर (प्रतिनिधि)
वरील विषयान्वये आम्ही खालील सही करणार सर्व मुद्रांक विक्रेते व दस्त लेखक विनंतीपूर्वक निवेदन करतो की, मुद्रांक विक्रेते ब्रिटीश काळापासून शासन व जनतेमधील दुवा असून दोघांमध्ये समन्वय साधण्या

ना. श्री. अनिल भाईदास पाटील
यांची नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.. ।
चे उत्तम माध्यम आहे. याची आपणास जाणीव आहे. काही दिवसांपूर्वी न्यूज चैनल आणि दैनिक पुढारी मुंबई आवृत्ती या वर्तमान पत्रात रु.१०० व रु. ५००/- चे मुद्रांक चलनातून बाद करण्याबाबत शासन प्रस्ताव मंजूरीस्तव सादर करण्यात आलेला आहे. याबाबत एका वृत्त वाहिनीला मुलाखत देतांना राज्याचे मा.महसूल राज्य मंत्री महोदय यांनी सांगीतले आहे. त्यामुळे रु.१०० व रु.५००/- चे मुद्रांक चलनातून बाद करण्याच्या निर्णयाला आमचा विरोध आम्ही या निवेदनाव्दारे आपणास सादर करीत आहोत, महोदय सध्या स्थितीत महाराष्ट्र राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अंतर्गत सुमारे ४००० चे जवळपास मुद्रांक विक्रेते कार्यरत असून या निर्णयामुळे आमच्यावर अवलंबून असणा-या सर्व घटकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. महोदय मुद्रांक विक्री ही आमच्या उदरनिर्वाहाचे साधन असून ते कृपया हिरावून घेऊ नये. याबाबत मुद्रांक विक्रेते यांच्याबाबत बोलतांना माननीय मंत्री महोदय यांनी मुद्रांक विक्रेते यांना फ्रेंकोग मशीन देण्याचा शासनाचा विचार चालू असल्याचे देखील सांगीतले आहे. परंतू फ्रैंकीग मशीन फारच महाग आणि खर्चीक आहे. त्याचे मेंटेनन्स देखील आजच्या घडीस परवडणारे नाही. ई. एस. बी. टी. आर साठी शासन बँकांना १५० रुपये कमीशन देत असून तेच काम मुद्रांक विक्रेते मुद्रांक पेपर विक्री करतांना नाममात्र ३ टक्के इतक्या मनौतीवर सध्या स्थितीत शासनाची सेवा करत आहे.