चरण तुझे गुरुराया म्हणत १ लाख भाविकांनी घेतले पादुकांचे दर्शन; अजिंठ्याच्या लेणींच्या पायथ्याशी गर्दीचा महापूर..

सोयगाव, (साईदास पवार)चरण तुझे गुरुराया हीच माझी देवपूजा ही श्रध्दा मनात ठेवून गुरुवार (दि.०५) श्री स्वामी जगद्गुरू नरेंद्र चार्य महाराज यांच्या सिध्द पादुकांचे दर्शन सोहळ्यात एक लाख

भाविकानी दर्शन घेतले यावेळी आठ हजार भक्त गनांनी उपासक दीक्षा घेवून गुरुपुजन केले
फर्दापूरच्या ठाणा शिवारात अजिंठ्याच्या लेणींच्या पायथ्याशी हा एक दिवसीय सोहळा आयोजित करण्यात आला होता दरम्यान पहाटे आठ वाजता सिध्द पादुकांची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर संतपीठावर पादुका विराजमान करण्यात आल्या यावेळी गुरुपुजन करुन जनम प्रवचन कार दिलीप कुमार सोमदे यांनी प्रवचन करून भाविकांना मंत्रामुग्ध केले यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे माजी आमदार सांडू पाटील बनकर,प्रभाकर पालोदकर ,मंत्री अब्दुल सत्तार यांचे बंधू जावेद शेख भाजपचे सुरेश बनकर ज्ञानेश्वर मोठे सुनील मिरकार नगरसेवक राजू दुतोंडे बबलू शेख बंडू काळे सरपंच जाकीर भाई सदस्य योगेश शिंदे राहुल दामोदर आदींच्या हस्ते सामाजिक उपक्रमांअंतर्गत दुर्बल घटक पुनर्वसन अंतर्गत ,४८ गरजू महिलांना संस्थांनच्या वतीने मोफत आधुनिक पीठ गिरणी वितरण करण्यात आली यावेळी मराठवाडा उपपीठ प्रमुक गणेश मोरे सुभाष जोजारे मधुकर खैरे जिल्हा निरीक्षक संदीप थोरात साहेबराव आहेर तालुकाध्यक्ष संतोष झोड विकास जैवळ आदींनी या उपक्रमात पुढाकार घेतला दरम्यान नरेंद्र चार्य संस्थांनच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमांची चित्रफीत दाखविण्यात आली या दर्शन सोहळ्यात आठ हजार भक्त गणांनी उपासक दीक्षा घेतली गुरुपूजेचा मान छत्रपती संभाजीनगर येथील ज्ञानेश्वर जाधव व शोभा जाधव या दाम्पत्याना मिळाला
दरम्यान या दर्शन सोहळ्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक भरत मोरे यांच्या नेतृत्वाखाली दंगा काबू पथक सोयगाव अजिंठा फर्दापूर पोलीस ठाण्याच्या कर्मचारी मैदानात तैनात करण्यात आले होते
चौकट—सिद्ध पादुका दर्शन सोहळा साठी एक लाख भाविकांनी हजेरी लावली होती त्यामुळे रात्री उशीरा पर्यंत दर्शन सोहळा सुरूच होता….
—–एक लाख भाविकांना बुंदीचा महाप्रसाद देण्यात आला होता त्यामुळे या बुंदीचा महाप्रसाद चा भाविकांनी लाभ घेतला सोयगाव सिल्लोड आणि कन्नड आगरातुन भाविकांना विशेष जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या यावेळी हेमंत पाटील उत्तम गवळे साई दास पवार नंदू महाजन अजय राठोड अमोल उबाळे आदींनी महाप्रसादसाठी पुढाकार घेतला होता..