आता घरवापसी नाही!
भाजपसोबत गेलेल्यांना शरद पवारांचा इशारा..

24 प्राईम न्यूज 6 Oct 2023 अजित पवार आणि तुमचे अनेक जुने सहकारी तुमचा पक्ष सोडून गेले, तरीही तुम्ही सणवाराचे निमित्त करून एकमेकांना भेटता. प्रफुल्ल पटेल यांनाही भेटता. तास-दोन तास चर्चा करता, तुमचे चॅटिंगही सुरू असते, मग लोकांनी काय समजायचे ? तुम्ही इंडिया आघाडीसोबत राहायचे आणि अजित पवारांनी आता भाजपसोबत राहायचे आणि लोकसभा निवडणुकीनंतर परत यायचे, असे काही तुमच्या कुटुंबाचे ठरले आहे काय ? या थेटप्रश्नावर शरद पवारांनी ‘भाजपसोबत गेलेल्यांना मी परत घेणार नाही’, असे निःसंदिग्ध उत्तर दिले राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडली आहे. अजित पवार आणि आणखी ज्येष्ठ नेते भाजपसोबत गेले आहेत आणि तुम्ही आणि सुप्रिया सुळे यांच्यासह इतर नेते इंडिया आघाडीसोबत आहेत, अशावेळी कार्यकर्ते संभ्रमात राहणार नाहीत का, असे विचारले असता शरद पवार यांनी आमची भूमिका स्पष्ट आहे. भाजपविरोधात आमचा लढा कायम सुरू राहील. कार्यकर्त्यांनाही याची कल्पना आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्ट केले.