धुळे, जिल्हा क्रीडा संकुल, धुळे. तर्फे आयोजित “जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत” स्वेस हायस्कूलला “विजेतेपद”

धुळे (अनिस खाटीक) 3 ऑक्टोंबर रोजी “मोहाडी”( धुळे )येथील “पिंपळादेवी हायस्कूल ” मध्ये 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या “जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे ” आयोजन करण्यात आले

ले होते. या स्पर्धेत स्वेस उर्दू हायस्कूल ने जे.आर. सिटी हायस्कूल, हाजी मोहम्मद उस्मान मराठी हायस्कूल यांना पराभूत करून “फायनल” मध्ये प्रवेश केला आणि फायनल मॅच पिंपळादेवी हायस्कूल मोहाडी यांच्या विरुद्ध झाला. या अटीतटीच्या सामन्यात स्वेस उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पिंपळादेवीला त्यांच्यात शाळेत नमवून “विजेते पद ” प्राप्त केले.
या विजयामुळे स्वेस उर्दू हायस्कूलच्या कबड्डीच्या संघाची निवड “विभागीय स्तरावर” झालेली आहे.
विद्यार्थ्यांनी विजेतेपद प्राप्त केल्याबद्दल स्वेस संस्थेचे पदाधिकारी हाजी अखलाख अहमद,हाजी मोहम्मद अफ्फान सर,जाहीद हुसेन भैया तसेच मुख्याध्यापिका श्रीमती चाहत मॅडम व सर्व कर्मचारी वर्गांनी मुलांचे अभिनंदन केले.
मुलांना विजेतेपद प्राप्त व्हावे यासाठी शाळेचे क्रीडा शिक्षक “श्रीमती शमीम मॅडम” आणि “जावीद सर “यांनी कठोर परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांचा मार्गदर्शन केले.