एमआयएम पक्षाने कोल्हापूर रेंजचे स्पेशल आयजीपी
यांना मागण्यासह दिले निवेदन..

धुळे/अनिस खाटीक
एम आय एम तर्फे निवेदनाद्वारे मागण्या करण्यात येते की,
१. विक्रम पावसकर प्रदेश उपाध्यक्ष बीजेपी यांच्यावर गुन्हा नोंदवून कार्यवाही
करण्यात यावी
२. डीएसपी सातारा व त्यांचे हाताखालचे संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित
करून
कर्तव्यात कसूर केल्याबाबत कार्यवाही करण्यात यावी.
३. नुरूल हसन याच्या कुटुंबियास एक कोटी मोबदला व त्याच्या विधवा बायकोस
सरकारी सेवेत समाविष्ट करून घेण्याकरिता,
४. मस्जिदीचे झालेले नुकसान दुचाकी वाहने जाळलेल्याचे नुकसान व मोबाईल
शॉपच्या नुकसानीची भरपाई शासनाकडून देण्यात यावी.
५. प्रत्येक गंभिररित्या जखमी झालेल्या व्यक्तीला एक लाख रुपये मोबदला म्हणून
देण्यात यावा.

महोदय,
संदर्भिय पत्र क्रं. १ अनुसार मा गृहमंत्री, राज्याचे पोलिस महासंचालक, कोल्हापूर रेंजचे रेपशल आयजीपी व डीएसपी सातारा यांना निवेदन देऊन माहिती देवून योग्य ती कार्यवाही करणे बाबत विनंती करण्यात आली होती. तसेच संदर्भिय पत्र . २ अनुसार निवेदन देवून माहिती देऊन यांना विनंती करण्यात आली होती. या बाबत कोणताही निर्णय न झाल्यामुळे पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करून पूर्ण महाराष्ट्रातून हे निवेदन संबंधित अधिकारी मार्फत सर्व उच्चस्तरीय अॅथॉरिटीस यांना देण्यात येत आहे. त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे.
दिनांक १०/०९/२०२३ रोजी मौजे पुरोसावली ता. खटाव, जि. सातारा येथे रात्री ८:४५ पासून ९:३० पर्यंत मुस्लीम समाजावर झालेला हल्ला. त्यात मृत्यू पावलेले एक मुस्लीम युवक व गंभीररित्या एकूण १३ मुस्लीम युवकांना व मस्जिदीचे अपमान व नुकसान केल्याबाबत आम्ही माहिती देवून मागण्या करत आहोत.
१. पोलिसांचे कर्तव्यात कसूर, जाणून बुजून दुर्लक्ष करणे व दंगल घडवून आणणाऱ्यांवर
काहीच कार्यवाही न करणे या बाबत माहिती,
अ) ज्या इन्स्ट्राग्रामवर हिंदू देवी देवतांचे आक्षेपाहय पोस्ट करण्यात आले होते त्या बाबत पोलिसांनी अद्याप काही माहिती दिली नाही. ते पोस्ट फोन हॅक करून कट रचून टाकण्यात आले होते की कसे? हिंसाचार होऊन जवळपास एक महिना उलटला असून त्याबाबत काही झालेले नाही.
ब) पोलिसांनी खोटी माहिती दिली की दोन गटात राडा व पोलिसांनी आमचे प्रदेश अध्यक्ष (कार्यकारी) यांना खोटी माहिती दिली की, कोणीही गंभिररित्या जखमी झालेले नाही.
क) विक्रम पावसकर जे महाराष्ट्र प्रदेश बीजेपी चे उपाध्यक्ष आहेत त्यांनी दि. १९/०८/२०२३ रोजी काढलेला मोर्चा व त्यामध्ये दंगली भडकविणारे भाषण दिल्याबाबत पोलिसांनी काहीच कार्यवाही केली नाही.
ड) पुसेसावली गावातील काही नागरिकांनी दि. २८/०८/२०२३ रोजी व दि. ०८/१०/२०२३ रोजी दिलेल्या निवेदनाला पोलिसांनी काही प्रतिसाद न देता केराच्या टोपलीत टाकले.
इ) विक्रम पावसकर व त्याच्या टोळीतील व्यक्तीचे नाव एफआयआर मध्ये, तक्रार असतांना सुद्धा नाव टाकण्यात आले नाही. पोलिसांनी विक्रम पावसकर व त्याच्या टोळीतील
माणसांची त्या प्रकरणाच्या वेळीची, त्या आगोदरच्या वेळीची व नंतरच्या वेळेची कॉल रेकॉर्डींग, सीसीटीव्ही फुटेज व इतर बाबींची चौकशी का केली नाही ?
य) पोलिस यंत्रणा दंगली, हिंसाचार, मुस्लीम व्यक्तीचे मृत्यू व मस्जिदीच्या नुकसानानंतर जवळपास अडीच तास उशिरा पोहोचले
२. या दंगलीत नुरूल हसन मृत्यू पावलेल्या बाबतची माहिती.”
नुरुल हसन मृत्यू पावलेला मुस्लीम युवक ३१ वर्षांचा असून तो सिव्हील इंजिनियर होता आणि त्याचे वडील लियाकत उस्मान शिकलकरी एक निवृत्त शिक्षक आहेत. नुरुल हसन ला भाऊ, बहिण नाही, त्याचे लग्न काही महिन्यांपूर्वी झाले असून त्याची बायको गर्भवती आहे. या दंगलीत मृत्यू पावलेले नुरूल हसन व इतर गंभिररित्या जखमी झालेले सर्व व्यक्ती निर्दोष आहेत व त्या मस्जिदीत प्रार्थना करीत असताना क्रूर हल्ला व अमानुष हिंसाचार करण्यात आला होता.
या सर्व बाबींची आपणास माहिती देऊन खालील मागण्या विनंतीपूर्वक करण्यात येत आहेत.
१. विक्रम पावसकर प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी यांच्यावर एफआयआर नोंद करुन कार्यवाही करण्यात यावी. विक्रम पावसकर यांच्या क्रूकृत्यामध्ये गृहमंत्रालय बाबत काही संबंध आहे का नाही? याची सखोल चौकशी झाली पाहिजे.
२. सातारा येथील डीएसपी यांना व त्यांच्या खालच्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबीत करुन व कर्तव्यात कसूर केल्याबद्दल तसेच जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्याबद्दल कार्यवाही करण्यात यावी.
३. मृत्यू पावलेले नुरूल हसन याच्या कुटुंबाला एक कोटी रुपये शासनाकडून मोबदला तसेच त्याच्या विधवा बायकोला शासकीय सेवेत समाविष्ट करुन घेण्यात यावे.
४. मस्जिदीचे झालेल्या नुकसानीची, ज्यांची दुचाकी वाहने जाळण्यात आली, ज्यांचे मोबाईल शॉप जाळण्यात आली त्यांच्या झालेल्या नुकसानीची शासनाकडून भरपाई करुन देण्यात यावी.
५. प्रत्येक गंभिररित्या जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीस एक लाख रुपये मोबदला देण्यात यावा.
करिता सदरचे निवेदन आपल्या मार्फत मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, मुंबई. मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा. गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य. मुंबई व मा.
अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई
यांना या निवेदनाच्या प्रति देऊन पाठविण्याची विनंती.
नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक सईद बेग,नगरसेवक मुक्तार बिल्डर, नगरसेवक आमिर पठाण ,माजी नगरसेवक साजिद साई, इलियास सर,प्यारेलाल पिंजारी,इकबाल शाह,शोएब मुल्ला,कैसर अहमद,एजाज सय्यद,हलीम शमसुद्दिन, सउद सरदार,आसिफ शाह,फातेमा अन्सारी,शकीला शेख,अकीला मणियार , महेमूना अंसारी,रिझवाना शेख,सायरा अन्सारी, नजर पठाण,सलमान खान,समीर मिर्झा,फैसल अन्सारी, सउद आलम,शाहरुख शाह,आदी उपस्थित होते.