माजी आमदारांच्या गाडीला अपघात..

अमळनेर /प्रतिनिधि धुळे येथून सर्व्हिसिंग करून येत असलेल्या माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांच्या वाहनाला नवलनगरजवळ अपघात झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. यावेळी वाहनात माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील नव्हते. केवळ चालक होता. गाडीतील दोन्ही एअर बॅग उघडल्याने चालक किरकोळ जखमी झाला.