वर्ल्डकपच्या इतिहासातील पाकिस्तानचा सर्वांत मोठा विजय..

0

24 प्राईम न्यूज 11Oct 2023 वर्डकपच्या ४८ वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवण्याचा पराक्रम पाकिस्तान क्रिकेट संघाने केला आहे. आज श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये पाकिस्तानने श्रीलंकेचा सहा गडी राखून दणदणीत पराभव केला. बीलंकेने उभारलेल्या ३४५ पावांचा डोंगर पाकिस्तानने ४८.२ षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात पार करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार पाकिस्तानचा विकेटकीपर मोहम्मद रिजवान राहिला. त्याने १२१ १३९ धावा ठोकताना शेवटपर्यंत नाबाद राहून पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याला सलामीवीर अब्दुला शफिकची सुद्धा साथ मिळाली. त्याने ११३ धावांची खेळी करत विजयाचा पाया रचला.क्रिकेट वर्ल्डकपला प्रारंभ झाल्यापासून विक्रमांवर विक्रम रचले जात आहेत. स्पर्धेता सुरुवात होऊन एक आठवडा झाला नसतानाही गेल्या ४८ वर्षांमधील विक्रम एक आठवडाभरात मोडीत निघाले आहेत. आज श्रीलंका विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात चार शतके या सामन्यामध्ये नोंदवली गेली. त्यामुळे आजवरच्या वर्ल्डकपच्या इतिहासातील चार वैयक्तिक शतके नोंदवणारा सामना ठरला आहे. क्रिकेटचा इतिहासातील हा मोठा विक्रम आहे. वर्ल्डकपमध्ये आजपर्यंत झालेल्या कोणत्याही सामन्यामध्ये चार वैयक्तिक शतके नोंदवली गेली नव्हती. त्यामुळे हा एक रेकॉर्ड ब्रेक वर्ल्ड कप ठरत आहे. श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने झळकावलेल्या विक्रमी शतकानंतर सदीरा समरविक्रमाने मुदा झळकावलेल्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेला मोठी धावसंख्या उभारता आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!