जरंडीच्या रेशन दुकानाला दोन महिन्यांपासून धान्याचा पुरवठाच नाही;महसूलचे दुर्लक्ष..

सोयगाव(साईदास पवार)…..जरंडी( ता सोयगाव )येथील स्वस्त धान्य दुकानाला माहे सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्याचा धान्याचा पुरवठाच झाला नसल्याची तक्रार सरपंच स्वाती पाटील यांनी बुधवारी सोयगाव तहसील कार्यालयात दिली आहे त्यामुळे तहसील प्रशासन चक्रावून गेले
जरंडीच्या धान्य दुकानात सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्याचा धान्य पुरवठा झालेला नाही त्यामुळे शिधापत्रिका धारकांवर उपासमारीची वेळ आली आहे धान्याचं मिळत नसल्यामुळे दोन महिन्यांपासून मजुरांना विकतचे धान्य घेवून उदर निर्वाह करावा लागत आहे दरम्यान तालुक्यात सर्व धान्य दुकानांना धान्याचा पुरवठा झालेला आहे पण जरंडी रेशन दुकान धान्य पुरवठ्यामधून वगळले गेले आहे त्यामुळे जरंडी च्या दुकानाचा रेशन चा माल गेला कुठे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे जरंडी गावासाठी १२३ क्विंटल प्रति महिना धान्य लागते परंतु दोन महिन्यांत एक दाणा ही पुरवठा झालेला नाही याबाबत तहसील चा पुरवठा विभाग शब्दही बोलण्यास तयार नाही त्यामुळे संभ्रम वाढला आहे एकीकडे रेशन दुकानात धान्य नसल्याने दुसरीकडे मात्र शिधापत्रिका धारकांना धान्य साठी भटकंती करावी लागत आहे
——आगस्ट महिन्यात पुरविण्यात आलेल्या धान्यात गोणीत धान्य कमी मिळाल्याने ९२ शिधापत्रिका धारकांना पावत्या फाडुनही धान्य मिळाले नव्हते याप्रकरणी ग्रामपंचायत ने थेट धान्य दुकानात जाऊन या प्रकाराची शहानिशा केली असता सोयगाव च्या पुरवठा विभागामधून गोणीत धान्य कमी असल्याचे निष्पन्न झाले होते याबाबत सरपंच उपसरपंच यांनी तहसील च्या पुरवठा विभागात याबाबत चौकशी केली असता त्यांनी कमी झालेले २६ क्विंटल धान्य सप्टेंबर च्या कोठया मधून जरंडी दुकानात पुरविले होते परंतु आता सप्टेंबर चा व ऑक्टोबर चा असा दोन महिन्याचा कोठा मिळाला नाही याबाबत तहसीलदार मोहनलाल हरणे यांचेशी संपर्क साधला असता याबाबत चौकशी करून जरंडीला धान्य पुरवठा करण्याबाबत संबंधित विभागाला तातडीच्या सूचना देतो असे सांगितले
—–त्या ९२ कार्ड धारकांना आता धान्य मिळेल का?
दरम्यान सप्टेंबर च्या कोठयातून आगस्ट मध्ये कमी पडलेल्या धान्याची वाटप झाली आहे त्यामुळे सप्टेंबर च्या कोठ्यात आधीच उचल झालेले २६ क्विंटल धान्य मिळेल का हा प्रश्न अनुत्तरित आहे…..