जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मुली मध्ये पाचोरा ची आदिती व प्रणवी तर मुलामध्ये संस्कार प्रथम..

जळगाव (प्रतिनिधि)
जिल्हास्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ १७ वर्षा आतील गटात मुलांमध्ये एरंडोल चा पवार संस्कार तर मुलींमध्ये पाचोराच्या दोघी प्रणवी पाटील व अलहीत अदिती यांनी प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक प्राप्त केले.
विजयी प्रथम पाच मुली

व मुलांना जैन स्पोर्ट्स अकॅडमीव स्पोर्ट्स हाऊस तर्फे पदक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत १५ तालुक्यातील मुलांमध्ये ४९ तर मुलींमध्ये ५० खेळाडूंचा सहभाग होता.
सदर स्पर्धा स्विसलीग पद्धतीने सात फेऱ्यांमध्ये पूर्ण करण्यात आली.
पारितोषिक वितरण समारंभ
या पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे तथा जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख, बास्केटबॉल चे आंतर राष्ट्रीय पंच वाल्मीक पाटील व सोनल हटकर ,आरबिटर नथु सोमवंशी व क्रीडा समन्वयक मीनल थोरात आदींची उपस्थिती होती.
स्पर्धेतील विजेते व विभागीय पातळीवर निवड झालेले खेळाडू.
मुली
प्रणवी पाटील, आदिती आलहित,इशा राठोड, अमृता कोरे (सर्व पाचोरा) व काबरा ऋग्वेदा
मुले
पवार संस्कार एरंडोल, ठाकूर शरूण चोपडा, ओम दलाल रावेर, दर्शन चौधरी जळगाव, सोहम महाजन रावेर
स्पर्धेतील पंच
मुख्यपंच प्रवीण ठाकरे, सहायक पंच नथू सोमवंशी, अभिषेक जाधव व सोमदत्त तिवारी.
फोटो कॅप्शन
खुर्चीवर बसलेले डावीकडून फारुक शेख,सोनल पाटील, मीनल थोरात, नत्थु सोमवंशी, वाल्मीक पाटील व अभिषेक जाधव दिसत आहे