आरोग्यदुताचे योगदान महिलेस मिळाले जीवदान..!

एरंडोल /कुंदन ठाकुर. एरंडोल माळी वाडा येथील ललिता महाजन ही महिला 1 ते दिड महिन्यापासून आजारी होत्या गावातील काही ठिकाणी उपचार करून देखील कुठलाही फरक न पडल्या मुळे त्यांनी जळगाव गाठले त्यांनी त्या ठिकाणी काही तपासण्या केल्या असता त्यांना कॅन्सर सारखा भयंकर आजार असल्याचे निष्पन्न झाले.
त्या नंतर त्यांना जानकर लोकानी नाशिक येथील मानवता HCG ह्या दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला तिथे गेले असता त्यांना लवकरात लवकर ऑपरेशन करावे लागेल असे सांगण्यात आले व त्यासाठी साधारण दिड ते दोन लाख रुपये खर्च लागेल असे देखील सांगण्यात आले.
परंतु तेवढी परिस्तिथी नसल्याने ते माघारी परतले त्यावेळेस त्यांना एरंडोल मधून सामाजिक कार्यकर्ते सचिन महाजन यांचे कडून जय बाबाजी फाऊंडेशन नाशिक यांचा संपर्क देण्यात आला असता फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री उमेश अभिमान महाजन यांनी शासनाच्या योजनेच्या माध्यमातून विभागीय संदर्भ रुग्णालय नाशिक येथे त्यांचे ऑपरेशन मोफत घडवून आणले.
ऑपरेशन झाल्यानंतर नातेवाईकांच्या चेहर्यावर आनंदाचे क्षण उमटले होते
त्या नंतर नातेवाईकांनी फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री उमेश महाजन यांचे आभार मानले
“माझ्या फाऊंडेशन च्या माध्यमातून आता पर्यंत कॅन्सर चे 12 रुग्ण किडनीचे 5 रुग्ण व लहान मोठे असे 35 ऑपरेशन चे रुग्ण यांचे सर्व उपचार हे मोफत झाले आहे आणी अशी गोर गरिबाची सेवा करताना आणी त्यांच्या चेहर्यावर चा आनंद पाहतांना मला देखील आनंद होतो”
उमेश महाजन संस्थापक अध्यक्ष उमेश महाजन,नाशिक (एरंडोल)