जिल्हास्तरीय मनपा बुद्धिबळ स्पर्धेत तसीन ,जयेश व उज्वल प्रथम..

जळगाव ( प्रतिनिधि )
मंपाजळगाव, जिल्हा बुद्धिबळ संघटना व रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने रोजलँड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये १४,१७ व १९ वर्षातील मुलांच्या स्पर्धा घेण्यात आल्या त्यात १४
वर्षे वयोगटात तसीन रफिक
तडवी, सेंट तेरे, १७ वर्षातील गटात जयेश विजय सपकाळे,सेंट जोसेफ, १९ वर्षातील गटात उज्वल
भारत आमले, नूतन मराठा कॉलेज यांनी प्रथम क्रमांक मिळून सुवर्णपदक पटकाविले.

स्पर्धेचे उद्घाटन
उद्घाटन हस्ते महाराष्ट्र बुद्धी बळ संघटना चे उपाध्यक्ष फारुक शेख, प्रमुख अतिथी अटलेटिक्स असो चे राजेश जाधव,खोखो चे जयांशू पोळ, जैन स्पोर्ट्स चे रवींद्र धर्माधिकारी,बास्केटबॉल चे संजय पाटील, मुख्याध्यापिका सौ सुले व क्रीडा शिक्षक जितेंद्र सोनार यांची उपस्थिती होती.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ
तिघी गटातील प्रथम पाच विद्यार्थी यांची नाशिक विभागीय पातळी साठी निवड करण्यात आली त्या प्रत्येकी पाच मुलांना स्पोर्ट्स हाऊस व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यामार्फत पदक देण्यात आली या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुख शेख, महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरिक रफिक तडवी, बुद्धिबळ संघटनेचे सचिव नंदलाल गादिया,पोलीस दलाचे बी के पाटील, एम आय एम चे अहमद सर आदींची उपस्थिती होती.
स्पर्धेतील निवड झालेले व पदक पटकावणारे खेळाडू
१४ वर्ष आतील
१)तसीन रफिक तडवी, सेंट टेरेसा स्कूल
२)हर्षवर्धन महेंद्र बडे ओरियन स्कूल स्टेट बोर्ड,
३) राघव संजीव कुमार मंत्री, ओरियन सीबीएससी
४)सुशांत वारके, पोदार
५) श्री प्रकाश शर्मा सेंट लॉरेन्स
१७ वर्षातील
१)यश विजय सपकाळे, सेंट जोसेफ
२)कार्तिक संजय कासार भगीरथ स्कूल
३)सुजल प्रदीप चौधरी छत्रपती शिवाजी महाविद्यालय
४)जतीन राजेंद्र वाणी, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल
५)प्रेम विनोद पाटील आर आर विद्यालय
६)आयुष दीपक जैन अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल
१९ वर्षा आतील
१)उज्वल भारत आमले, नूतन मराठा
२)मयूर प्रभाकर बडगुजर एडवोकेट बाहेती कॉलेज
३)नमन पवन सुराणा, सेंट टेरेसा,
४)अजय नाजूकराव सोनवणे ५)मुकुल सुनील तारे
दोघी स्वामी विवेकानंद कॉलेज (एमजे)