उमेश पाटील यांची युवा संघर्ष यात्रा च्या प्रभारी पदी निवड..
-राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड…

अमळनेर/प्रतिनिधि
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ग्रंथालय विभागाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष उमेश पाटील यांची युवा संघर्ष यात्रा च्या प्रभारी पदी निवड करण्यात आली नुकतेच पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पाटील यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले
युवा आमदार रोहित दादा पवार हे २४ ऑक्टोबर पासून युवा संघर्ष यात्रेची सुरुवात पुणे येथून करणार असून त्यांच्या यात्रा ६ डिसेंबर रोजी नागपूर येथे संपन्न होणार आहे. ८००, किलोमीटरचे एकूण अंतर असून ४२ दिवसात पूर्ण होणार आहे. संपूर्ण बेचाळीस दिवस आमदार रोहित दादा पवार हे पायी चालणार आहेत व त्यांच्यासोबत शेकडोच्या संख्येने युवक पदयात्रेत सहभाग घेणार आहेत. त्या पदयात्रेच्या नियोजनासाठी श्री उमेश पाटील प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालय विभाग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.