एरंडोल येथे “माझी माती माझा देश” उपक्रमाची उत्साहात सांगता..

.
एरंडोल /कुंदन ठाकुर. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव समारोपीय कार्यक्रमांतर्गत “माझी माती माझा देश”कार्यक्रम एरंडोल पंचायत समिती आवारात आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. प्रारंभी दीप प्रज्वलन व संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन होऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर स्वातंत्र्य सैनिकांच्या शिलालेखाला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी तालुक्यातील गावांमधून माझी माती माझा देश या उपक्रमांतर्गत आलेल्या कलशांन मधील माती तालुक्याच्या एका कलशात एकत्रित करण्यात आली व त्या कलशाची वाजत गाजत पंचायत समितीच्या आवारापासून मिरवणूक काढण्यात येऊन डॉक्टर आंबेडकर चौकातील राष्ट्रध्वज स्तंभाजवळ कार्यक्रमाची सांगता उत्साहात करण्यात आली. स्वातंत्र्यसंग्रामामध्ये हुतात्मा झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदारांचा यावेळी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रवींद्र जाधव, एस आर पाटील ,संभाजी देसले, गटविकास अधिकारी दादाजी जाधव, जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे उपअभियंता वाय एन थोरात. तालुका आरोग्य अधिकारी मनोज चौधरी अधिकारी वर्ग सरपंच ग्रामसेवक अंगणवाडी मदतनीस तसेच पंचायत समितीच्या सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी नागरिक उपस्थित होते.
आमदार चिमणराव पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून “आपल्यासाठी देशाने काय केले त्यापेक्षा आपण देशासाठी काय करू शकतो “याचा विचार सर्वांनी केला पाहिजे लोकशाहीचे रक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी सर्व नागरिकांवर आहे असे प्रतिपादन केले.
प्रास्ताविक एरंडोल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दादाजी जाधव यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश पाटील यांनी केले शेवटी ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष आर एन पवार यांनी आभार प्रदर्शन केले.