बस मधून प्रवाश्यांचे पैसे लांबवणाऱ्या चाळीसगाव येथील महिलेला अटक..

अमळनेर/प्रतिनिधि
अमळनेर बस मधून प्रवाश्यांचे पैसे लांबवणाऱ्या चाळीसगाव येथील महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
भीमराव सोनू बिन्हाडे, धुळे

हे ११ रोजी दुपारी १ | वाजेच्या सुमारास अमळनेरहून दोधवद (हिंगोणे) येथे | जाण्यासाठी बस मध्ये चढत असताना एका महिलेने त्यांच्या खिश्यात हात घालून सहाशे रुपये काढत असताना बिन्हाडे यांनी हात पकडला. मात्र महिलेने | हात झटकून पळ काढला. त्यावेळी बसस्थानकावरील | लोकांनी तिला पकडले. पोलीस चौकीतील महिला कॉन्स्टेबल नम्रता जरे, अशोक कुमावत, निलेश मोरे यांनी तिला ताब्यात घेऊन तिची विचारपूस केली | असता तिने तिचे नाव संगीताबाई विष्णू लोंढे वय ४५ रा इंदिरानगर चाळीसगाव असे सांगितले. बिऱ्हाडे यांच्या फिर्यादीवरून संगीताबाईसह अज्ञात चार | जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास | हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत.