भारत-पाक आज भिडणार..

24 प्राईम न्यूज 14 Oct 2023 गेल्या ७६ वर्षांपासून भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट लढतीचे औत्सुक्य टिकूनआहे मागील दशकभरात

राजनैतिक संबंध बिघडल्यामुळे उभय
संघांतील सामन्यांची संख्या रोडावली आहे. मात्र, शनिवारी
एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-
पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. पावसाचा या लढतीवर प्रभाव राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताने यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत सलग दोन सामने जिंकले आहेत. त्याचप्रमाणे बाबर आझमच्या पाकिस्ताननेही दोन सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यामुळे उभय संघांत शनिवारी रंगतदार लढत अपेक्षित आहे.