अयोध्येत देशातील सर्वात मोठी मशीद उभारणार..

24 प्राईम न्यूज 14 Oct 2023. सलामती पीर दर्गा ट्रस्ट आणि सुन्नी वक्फ बोर्ड ऑफ इंडिया यांच्या पुढाकाराने अयोध्येच्या धन्नीपूर मध्ये “मुहम्मद बिन अब्दुल्ला” या नावाने मशीद बांधण्यात येणार आहे
अयोध्येत पुन्हा नव्याने मशीद उभारण्याची घोषणा
आज करण्यात आली. अयोध्येतील धन्नीपूर या ठिकाणी भारतातील सर्वात मोठी व

भव्य “मुहम्मद बिन अब्दुल्ला” या मशिदीच्या उभारणीचे काम आता सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा हाजी अराफत शेख यांनी गुरूवारी मुंबईतील रंगशारदा हॉलमध्ये केली. या मशिदीचे नाव व पहिले छायाचित्र यावेळी प्रसिद्ध करून पहिली “वीट” (शिलान्यास) सुन्नी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष मा. झुफर अहमद फारुकी यांच्या हाती सुपूर्द करून ती अयोध्या नगरीमध्ये पाठवण्यात आली.हाजी अरफात शेख यांनी सांगितले की, सलामती पीर दर्गा ट्रस्ट आणि सुन्नी वक्फ बोर्ड ऑफ इंडिया यांच्या पुढाकाराने अयोध्येच्या धन्नीपूर मध्ये “मुहम्मद बिन अब्दुल्ला” या नावाने मशीद बांधण्यात येणार आहे, मशिदीचा पायाभरणीचा कार्यक्रम आज मुंबईच्या रंग शारदा हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. हाजी अराफत शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्ड अध्यक्ष जफर फारुकी साहब, मौलाना अब्दुल्लाह इबल क़मर अल हुसैनी, मुफ्ती अजीजुर रेहमान – – फतेपुरी, सूफी लासानी पीर बिजापुरी, सुफी तरक्की पीर, सुफी फैहमी पीर, मौलाना अश शाह कादरी देवबंद, डॉ. हाबील खुराकिवाला, डॉ. आबिद सय्यद, मशिदीचे आर्किटेक इम्रान शेख यासह अनेक विद्वान, पीर, मौलाना या कार्यक्रमात सहभागी झाले होते. नऊ हजार नमाजींची व्यवस्था –
५ एकरवर बांधल्या जाणाऱ्या या मशिदीत ९ हजारांहून अधिक लोक एकाच वेळी एकत्र नमाज अदा करू शकतात आणि त्यासोबत त्या जागेवर अनेक शैक्षणिक संकुले देखील उभारली जाणार आहेत. जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारे अनेक आकर्षक देखावे या ठिकाणी साकारले जाणार आहेत मशिदीला प्रमुख ५ द्वार असतील जे अनोख्या पद्धतीने बांधले जातील, मशिदीचे मिनार ३०० फुटांपेक्षा जास्त उंचीचे असतील. ही मशीद भारतातील सर्व मशिदी पेक्षा मोठी व आकर्षक असेल, असा दावा त्यांनी यावेळी केला.