जिल्हास्तरीय मनपा बुद्धिबळ स्पर्धेत विद्या, माही व जान्हवी प्रथम..

जळगाव/ प्रतिनिधि
मनपा जळगाव, जिल्हा बुद्धिबळ संघटना व रोझलँड इंग्लिश मेडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने रोझलँड
इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये १४,१७ व १९ वर्षातील मुलीच्या स्पर्धा संपन्न झाल्या.
स्पर्धेतील सहभाग
१४ व १७ वर्ष वयोगटात एकूण १५ तर १९ वयोगटात ३ शाळांचा समावेश होता .
१४ वयोगटात ५५ मुली
,१७ वयोगटात ५१ मुली व १९ वयोगटात फक्त ५ मुली अशा ७५ खेळाडूंचा सहभाग होता .
मराठी व उर्दू शाळांची पाठ
या व इतर शालेय स्पर्धेत मनपा हद्दीतील मराठी,उर्दू शाळांचा सहभाग नगण्य असल्याची खंत फारुक शेख यांनी व्यक्त केली तर मनपा शाळा सहभागच घेत नाही फक्त मनपा उर्दू शाळा क्रं ३६ ही बहुतांश खेळात भाग घेत असल्याने तेथील शिक्षक खाटीक हिदायत यांचे अतिथिंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ
तिघी गटातील प्रथम पाच खेळाडू यांची नाशिक विभागीय पातळी साठी निवड करण्यात आली त्या प्रत्येकी पाच मुलीना स्पोर्ट्स हाऊस व जैन स्पोर्ट्स अकॅडमी मार्फत पदक देण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुख शेख, माजी महापौर भारतीताई सोनवणे, बेंडाळे महाविद्यालयाच्या प्रा डॉ अनिता कोल्हे,रोझलॅंड प्राचार्य हर्षदा खडके, वंदना सोले, एम जे चे प्रा रणजित पाटील, आर्किटेक्ट जाहिद सैयद,पंच प्रमुख प्रवीण ठाकरे, नथ्थु सोमवंशी व प्रशांत पाटील आदींची उपस्थिती होती.
या क्रीडा शिक्षकांचा झाला गौरव
हिदायतूल्ला खाटीक,मनपा उर्दू शाळा,श्वेता कोळी, अनुभूती,हिमाली बोरोले,सेंट लॉरेन्स, संजय पाटील
अनुभूती स्कूल व छाया बोरसे पोदार स्कूल या क्रीडा शिक्षकांचा भारती ताई यांनी केला गौरव.
स्पर्धेतील निवड झालेले व पदक पटकावणारे खेळाडू
१४ वर्ष आतील
१) विद्या विनोद बागुल अनुभूती स्कूल
२) आराध्या भारत आमले प न लुंकड
३) सय्यद उम्मे कुलसुम सेंट टेरेसा
४) देविका संजय बेदरकर एस एल चौधरी विद्यालय
५) एमन रहीम शेख, मनपा उर्दू शाळा ३६
राखीव
६) लावण्या प्रदीप चव्हाण सेंट टेरेसा
१७ वर्षातील
१) माही पंकज संघवी पोदार
२) निधी राकेश जैन स्वामी विवेकानंद
३) वीणा दीपक गिरणारे स्वामी विवेकानंद
४) लोचना सतीश पाटील प न लंकड
५) सिद्धी धनराज सोनवणे प्रगती माध्यमिक
राखीव
६) समिधा मंगल रेघे ओरिअन सीबीएससी
१९ वर्षा आतील
१) जानवी संजय सपकाळे एडवोकेट बाहेती कॉलेज
२) वैशाली संजय रावतोडे, एम जे कॉलेज
३) कनिष्का संतोष मारवाडी
४) दृष्टी सचिन जैन
५) हंसिका भूषण दहाड
(तिन्ही सेंट टेरेसा)