एरंडोल शहरातील डेंगू कीटकजन्य आजार होऊ नये म्हणून कोरडा दिवस साजरा..

एरंडोल/कुंदन ठाकुर
एरंडोल शहरातील सध्याच्या सततच्या वातावरणातील बदलांमुळे शहरात कीटकजन्य आजार थंडी, ताप, मलेरिया, टायफाइड, फ्लू, डेंग्यू सदृश यासारखे आजाराचा फैलाव /लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी न.पा.ने युद्धपातळीवर संपूर्ण शहरातील उपाय योजना म्हणून यापूर्वीच शहरात न्यूयॉन, मलेरियन ऑइल व धुरळणी करण्यात आली आहे. तसेच दि.13/10/2023 रोजी शहरातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळण्यात आला. तरी शहरातील प्रत्येक नागरिकाच्या घरी जाऊन आजारांबद्दल उपाय योजना व माहिती देऊन साचलेले पाणी फेकून जंतुनाशक अबेटिंग साचलेले पात्रात टाकून नागरिकांना आजाराबद्दल सूचना देण्यात आल्या व शहरातील पाणीपुरवठा हा एक दिवस संपूर्ण बंद ठेवण्यात आला. तसेच जलशुद्धीकरण केंद्राची स्वच्छता करण्यात आली. या कामी मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री विकास नवाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नगरपालिका कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
तरी शहरातील नागरिकांनी खालील सूचनाचे पालन करावे व सहकार्य करावे
- पाणी उकळून व गाळून अथवा शुद्ध करूनच प्यावे.
- आठवड्यातून किमान एक दिवस घरातील सर्व पाण्याने भरलेले भांडी, टाक्या, कुलर इ. खाली करून घासून, पुसून, रिकामी करून एक दिवस उन्हात ठेवावी.
- पाण्याने भरलेली भांडी उघडी न ठेवता घट्ट झाकणांनी झाकावीत.
- पाण्याचा वापर जपून व काटकसरीने करावा तसेच आपल्या खाजगी नळांना तोट्या बसवून घ्याव्या.
- झोपताना मच्छरदाणी, कॉईल इ. प्रकारच्या उपाययोजना कराव्यात.
- शिळे अन्न उघडे अन्न खाऊ नये.
- आपल्या घरातील कचरा ओला व सुका वेगवेगळा करूनच न.पा. च्या घंटागाडीतच टाकावा. गटारीत किंवा इतरत्र उघड्यावर टाकू नये.
- घराजवळील पाणी वाहते करावे व साचलेल्या डबक्यावर निकामी ऑइल टाकावे.
- घराजवळील परिसर स्वच्छ ठेवून नगरपालिकेत सहकार्य करावे ही विनंती.