जरंडी च्या जिल्हा परिषदेच्या शाळेचा विद्यार्थी आता सुटा बुटात दिसणार;२५६ विद्यार्थ्यांना बूट व सॉक्सचे वितरण..

जरंडी, ता.(साईदास पवार).१४..जिल्हा परिषदेच्या शाळांचे शिक्षण अधिकाधिक दर्जेदार व्हावे यासाठी शासन स्तरावरून मोठे प्रयत्न सुरू असताना आदर्श गाव म्हणून जिल्ह्यात ओळख असलेल्या जरंडी च्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गणवेश वितरण योजने पाठोपाठ आता बूट आणि सॉक्सचे २५६ विद्यार्थ्यांना शनिवारी( ता.१४) वितरण करण्यात आले शालेय व्यवस्थापन समितीच्या खात्यात निधीं ची रक्कम वर्ग करून विद्यार्थ्यांना बूट व सॉक्स वाटप करण्यात आल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी रंगनाथ आढाव यांनी दिली
राज्य शासनाच्या निधीतून या बूट आणि सॉक्सचे वितरण साठी जरंडी च्या शालेय व्यवस्थापन समितीने १७० रु याप्रमाणे एका विद्यार्थ्यांवर खरेदीचा खर्च करून त्यांना बूट व सॉक्स खरेदी करून पहिली ते आठवीच्या २५६ विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले आहे यावेळी शालेय व्यवस्थापन अध्यक्ष साईदास पवार यांच्या हस्ते २५६ विद्यार्थ्यांना बूट व सॉक्स चे वितरण करण्यात आले आहे यावेळी मुख्याध्यापक बाळासाहेब सुळ, विलास वालदे, राजकुमार दिवेकर, वैशाली महाजन, हितेश मेश्राम, भूपेंद्र जांभुळकर, युनूस शेख, सुनील सोनवणे आदी शिक्षकांची उपस्थिती होती….