उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी इच्छूकांनी फिरविली पाठ;कागदपत्रे जुळवाजुळव साठी गेला वेळ..

जरंडी, ता.१६.(साईदास पवार)..माळेगाव पिंप्री ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक आणि तीन ग्रामपंचायतीच्या चार जागांच्या पोट निवडणुकी साठी सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता पहिल्याच दिवशीं इच्छूकांनी कागदपत्राच्या जुळवाजुळव साठी धावपळ उडाली होती
माळेगाव पिंप्री ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच सह सात सदस्यांसाठी व कवली डाभा आणि गलवाडा या तीन ग्रामपंचायतीच्या चार जागांचा पोट निवडणुकी साठी सोमवार (ता.१६) ते (ता.२०) पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे माळेगाव पिंप्री ग्रामपंचायत साठी ऑनलाइन तर कवली डाभा गलवाडा या तीन ग्रामपंचायत च्या चार जागांच्या पोट निवडणुकीसाठी पारंपरिक पद्धतीने उमेदवारी अर्ज स्वीकृती करण्यात येत आहे सोमवारी पहिल्याच दिवशी माळेगाव पिंपरी ग्रामपंचायत च्या सार्वत्रिक निवडणुकी साठी इच्छूकांनी कागदपत्रे जुळवाजुळव हाती घेतली होती त्यामुळे पहिला दिवस निरांक ठरला आहे
चौकट—माळेगाव पिंप्री ग्रामपंचायत साठी बिनविरोध साठी चर्चा सुरू आहेत या ग्रामपंचायतच्या निवडणुकी साठी थेट जनतेतून सरपंच पद निवड होत आहे बिनविरोध च्या चर्चा निष्फळ ठरल्यास या ग्रामपंचायत च्या निवडणुकीत चांगली साग चुरस्स होईल असे इच्छूकांच्या पूर्वतयारी वरून चित्र आहे