मीरा बोरवणकर यांची (“मॅडम कमिशनर”) पुस्तके बाजारातून गायब..

24 प्राईम न्यूज 19 Oct 2023
अजित पवारांच्या कथित येरवडा जमीन घोटाळ्यासारखे एकूण ३८ राजकीय गौप्यस्फोट करणारे मीरा बोरवणकर यांचे ‘मॅडम कमिशनर’ नावाचे पुस्तक सध्या बाजारात मिळेनासे झाले आहे. वाचकांना हे पुस्तक शोधून सापडत नसल्याने दुधाची तहान ताकावर भागवण्या साठी काहींनी त्यांचे २०१७ मध्ये प्रकाशीत झालेले ‘माझ्या आयुष्याची पाने’ हे पुस्तक शोधण्यास सुरुवात केली असून, ते पुस्तकसुद्धा बाजारात उपलब्ध नसल्याचे चित्र आहे.मीरा बोरवणकर यांच्या ‘मॅडम कमिशनर’ पुस्तकातून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील अनुभव कथन केले असून, यामुळे मात्र महाराष्ट्रातील राजकारण तापताना दिसत आहे. त्यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकामध्ये त्यांनी येरवड्यामधील पोलिस ठाण्याच्या जमिनीबाबतच्या प्रकरणावर केलेले लिखाण तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्यावर थेट आरोप करणारे असल्याने वाचक त्यावेळी नेमके काय घडले होते, याबाबत जाणून घेण्यास इच्छूक आहेत..