बहुलखेड्याजवळ गावठी व देशी दारु वर छापा;६४ हजाराचा मुद्देमाल हस्तगत-सोयगाव पोलिसांची कारवाई..

सोयगाव / साईदास पवार
सोयगाव, ता..२०..पाचोरा तालुक्यातून बहुलखेडा येथे चोरट्या मार्गाने विक्रीसाठी गावठी हातभट्टी ची दारू व देशी दारुच्या बाटल्या मोटारसायकल वरून घेऊन जात असताना पाठलाग करून रंगेहाथ पकडल्याची कारवाई शुक्रवारी (ता.२०) सायंकाळी सात वाजता सोयगाव पोलिसांनी बहुलखेडा गावाजवळ केली आहे या कारवाई मध्ये पोलिसांनी पन्नास लिटर गावठी हातभट्टीची दारुसह( अंदाजे किंमत दहा हजार रु) ८० देशी दारूच्या बाटल्या(किंमत चार हजार रु) व पन्नास हजार रु ची मोटारसायकल असा ६४ हजार रु चा मुद्देमाल हस्तगत केला आहे
शिंदाड ता पाचोरा येथून अनिल मासुम तडवी (वय-२७) हा मोटारसायकल वरून एका कॅन मध्ये पन्नास लिटर हातभट्टी ची दारू व देशी दारूच्या अंशी बाटल्या बहुलखेडा ता सोयगाव कडे चोरट्या मार्गाने विक्रीच्या उद्देशाने घेवून जात असल्याची माहिती सोयगाव पोलिसांना गुप्त बातमीदार मार्फत मिळाली त्यानुसार पोलिसांनी बहुलखेडा गावाजवळ सापळा रचून अनिल मासुम तडवी यास पाठलाग करून पकडले त्यांचेकडून पन्नास लिटर गावठी दारू देशी दारूच्या अंशी बाटल्या व मोटार सायकल असा एकूण ६४ हजार रु चा मुद्देमाल हस्तगत केला आहे या प्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राजू बर्डे ,अजय कोळी ,रवींद्र तायडे संजय सिंगल आदींनी ही कारवाई केली आहे….