सरपंच पदासाठी दोन तर सदस्य पदासाठी अठरा उमेदवारी अर्ज दाखल-माळेगाव पिंप्री ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक..

सोयगाव / साईदास पवार
सोयगाव, ता.२०…माळेगाव पिंप्री ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकी साठी सरपंच पदासाठी दोन तर सदस्य पदांसाठी अठरा असे वीस नामनिर्देशन पत्र शुक्रवारी (ता.२०) अंतिम मुदतीच्या दिवशी दाखल झाले आहे तर कवली आणि डाभा या दोन ग्रामपंचायत च्या तीन जागांसाठी पोट निवडणुकीसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याने या ग्रामपंचायत साठी पोट निवडणुकीसाठी मतदान होणार नसल्याचे चित्र आहे
माळेगाव पिंप्री ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक साठी सरपंच पदासाठी कल्याणी पाटील ,साधना परदेशी या दोन महिलांचे उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहे सदस्य पदासाठी प्रभाग एक साठी प्रमोद कोल्हे,सुपडू पाटील,सर्वसाधारण महिला साठी मंजुळा बाई बोरसे, देवका बाई बोखारे, शिलाबाई पाटील, कासाबाई गवळी, देवकाबाई गवळी अनुसूचित जातीसाठी नितीन सोनवणे, शालीकग्राम साळवे,प्रभाग दोन मध्ये सरलाबाई पाटील प्रतिभा पाटील सर्वसाधारण गटात अमोल पाटील, पुंडलिक पाटील,छोटू परदेशी, प्रभाग तीन मध्ये अनुसूचित जाती महिला साठी जिजाबाई जाधव, अवांताबाई जाधव,सर्वसाधारण महिला प्रवर्गात अनिता मोरे आणि सुनीता बाई शिवराम जाधव याप्रमाणे सरपंच पदासाठी दोन तर सदस्य पदासाठी अठरा असे अठरा उमेदवारी अर्ज माळेगाव पिंप्री ग्रामपंचायती साठी प्राप्त झाले आहे सोमवारी (,ता.२३) छाननी आणि बुधवरी (ता.२५) उमेदवारी अर्ज माघारी साठी मुदत आहे त्यामुळे माघारी नंतरच माळेगाव पिंप्री ग्रामपंचायत चे चित्र स्पष्ट होणार आहे निवडणूक नायब तहसिलदार हेमंत तायडे विजय कोळी सचिन ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली मोतीराम जोहरे फिरोज तडवी अमोल गायकवाड शिवप्रसाद बिरारी आदीनी कामकाज पाहिले….