इस्रायली सैन्यांनी रुग्णालयावर केलेल्या हल्ल्याचा निषेध व विश्वशांतीसाठी जळगावत धरणे..

जळगाव/ प्रतिनिधि इस्रायली सैन्यांनी गाझा हॉस्पिटल व नागरी वस्ती वर बॉम्बस्फोट, हवाई हल्ले करणे थांबून गाजा शहरातील नाकेबंदी उठ
वावी आणि संपूर्ण शांतता प्रस्थापित करावी या मागणीसाठी जळगाव शहरातील विविध सामाजिक संघटनेद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर निदर्शने धरणे आंदोलन करण्यात आले.


गाजातील रुग्णालयावर झालेल्या रॉकेट हल्ल्यात पाचशे नागरिक ठार झाले या घटनेबद्दल तसेच इसराइल सैन्यांचा युद्ध च्या आचारसंहिते विरुद्ध करीत असलेल्या कारवाईचा निषेध करण्यात आला.
रुग्णालयावर झालेल्या हल्ल्याने संतापाची लाट पसरली असून संयुक्त राष्ट्र संघाने हा युद्धातील गुन्हा म्हणून नोंद करावी अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली.
आंदोलना त विविध प्रकारचे बॅनर पोस्टर व घोषणा देण्यात येत होत्या त्यात प्रामुख्याने इजराइलने ७५ वर्षापासून पॅलेस्टाईन वर केलेल्या अतिक्रमणाचा दाखला देण्यात येऊन त्यांनी तेथून त्वरित पाय काढावा व मस्जिद अक्सा मुस्लिम समुदायाच्या ताब्यात द्यावी.
आंदोलनाच्या समाप्तीनंतर उपस्थिता तर्फे मोजके लोकानी महामहिम राष्ट्रपती मार्फत संयुक्त राष्ट्र महासचिव अँटिनियो गुटरेस यांना निवेदन पाठवण्यासाठी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कार्यालयात निवेदन सादर केले.
यावेळी झालेल्या बैठकीत प्रथम आंदोलनाचे समन्वयक फारुक शेख यांनी धरणे आंदोलनाची पार्श्वभूमी तसेच फिलिस्तीन व इजराइल चा युद्धाचा इतिहास सादर केला.
उपस्थितांनी सुद्धा गाजा शहरावर इस्रायली हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व मालमत्तेची हानी झाल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली.
आंदोलन स्थळी पुरुष महिलांसोबत लहान बालकांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात समावेश होता.
लहान बालकांच्या व महिलांच्या हातात बॅनर आणि फलक दिसून येत होते.
निवेदन सादर
मजहर पठाण यांच्या हस्ते निवासी अप जिल्हा अधिकारी सोपान कासार यांना निवेदन देण्यात आले या वेळी फारुक शेख,अन्वर खान, शाकीर खाटीक, शिबान फाईज यांची उपस्थिती होती