समता नगर घर जळालेल्या कुटुंबीयांना मुस्लिम मानियार बिरादरी तर्फे अन्नधान्याची मदत..

जळगाव/ प्रतिनिधि. समतानगर येथील वंजारी टेकडी येथे तीन घराला शॉर्ट सर्किट मूळे आग लागून नुकसान झाले बद्दल जळगाव जिल्हा मणियार बिरादरी तर्फे अध्यक्ष फारुक शेख यांनी प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन गहू व तांदूळ प्रत्येकी एक क्विंटल व रवा तसेच इतर धान्य धुडकाबाई गमा चव्हाण, समाधान गमा चव्हाण, दीपक गमा चव्हाण, सिमा समाधान चव्हाण,महेंद्र गमा चव्हाण यांना दिले.
या वेळी आर पी आय चे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल, एंजल फूड चे दानियल शेख, सिकलगर बिरादरी चे मुजाहिद खान, मर्कज चे रफिक खान आदी उपस्थित होते.