नवसाला पावणारी मनुदेवी …….आठव्या माळ साठी भाविकांची गर्दी….
छायाचित्र ओळ-निसर्गाच्या सानिध्यात मनुदेवी मंदिर दुसऱ्या छायाचित्रात मूर्ती..

सोयगाव/साईदास पवार
बोरमाळ तांडा घाटाच्या पायथ्याशी असलेली मनुदेवी नवसाला पावणारी देवी मनुदेवी म्हणुन ओळखली जाते नवरात्र उत्सव दरम्यान ह्या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते रविवारी आठव्या माळ साठी या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झाली नवरात्र उत्सव दरम्यान दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते उत्सव दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
ह्या डोंगरात प्राचीन काळी निजामाचे राज्य होते त्यांच्याकडे भरपुर दौलत होती मराठवाड्याचा माल खाली खान्देशमध्ये जाऊ देत नव्हते तर यासाठी पहारेकरी राहत असत त्यांच्यासाठी एक कोरीव वाडा कोरण्यात आला आहे आजही तरुण वर्ग हा वाडा पाहण्यासाठी उंच उंच टेकड्या झाडा झुडपातुन पायवाट काढत त्या ठिकाणी जातात तसेच लोहगाव ता.कन्नड येथील मुलगी लग्नाचा नकार देत डोंगरात आली व तीने वरुन उडी मारली खाली देवीच्या रूपात प्रगट झाली त्या देवीचे नाव मनुदेवी असे जानकर मंडळी सांगतात अशी अख्यायिका आहे मनुदेवीचे मंदीर हे घनदाट जंगलात व निसर्गरम्य वातावरणात असुन ह्या ठिकाणी आल्यावर मन शांत होत असते अनेकांनी केलेले नवस फेडण्यासाठी येथे येतात नवसाला पावणारी मनुदेवी आहे अशी देखील ओळख आहे परंतु ह्या तीर्थस्थळावर जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने पायवाटद्वारे ह्या मदीरावर जावे लागते ह्या तिर्थस्थळाचा विकास व्हावा अशी मागणी परीसरातील ग्रामस्थांनी केली आहे
बोरमाळ तांडा गावापासून काही अंतरावर मनुदेवीचे जागृत देवस्थान असुन मनुदेवीचा परीसर हा डोंगराच्या व्ही आकाराचा असुन येथे दीवसाच्या बारा वाजेला सुर्याचे दर्शन होते तर तीन वाजता सुर्य मावळतांना दीसतो परीसरात आजुबाजुला सागाचे घनदाट झाडे आहेत मंदीराच्या अगदी समोर जवळपास तीनशे फुटावरुन कोसळणारा धबधबा आकर्षक आहे येथुन एक नदीचा उगम झाला असुन त्या नदीस मनुबाई नावाने ओळखले जाते सोनारांची कुलदैवत असुन नवरात्र उत्सव दरम्यान सोनार मोठ्या संख्येने ह्या ठीकाणी येतात परंतु ह्या तिर्थस्थळावर जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने भक्ताने घनदाट जंगलातून पायपीट करावी लागते दरवर्षी बोरमाळ तांडा येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून ह्या मदीरापर्यत रस्ता तयार करण्यात येतो परंतु परीसरात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर होत असल्याने दरवर्षी हा रस्ता वाहुन जात असतो
तरी ह्या मदीरावर जाण्यासाठी शासनाने पक्का रस्ता करावा तसेच दोन ठिकाणी नळकांडी पुल बांधण्यात यावे व ह्या स्थळास तिर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा अशी मागणी सदाशिव राठोड, साहेबराव चव्हाण,हीरालाल चव्हाण,अजमल राठोड,राजाराम राठोड,धनसिंग पवार, कारभारी दागोंडे,हरी कोलते,गलचंद राठोड,सदाशिव राठोड, विलास कोलते ,नारायण खिल्लारे, सलतान चव्हाण
आदी ग्रामस्थांनी केली आहे.….