बॉम्बस्फोटां वेळी
दाऊद भाजपचा अध्यक्ष होता का?
उद्धव ठाकरे यांचा सणसणीत टोला..

अमळनेर/प्रतिनिधि राज्यात सध्या गाजत असलेल्या ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात असताना सरकारकडे यातील कोणत्याही प्रश्नांची उत्तरे नाहीत. हे अपयश झाकण्यासाठीच ललित पाटीलचा शिवसेनेशी संबंध असल्याचे आरोप केले जात आहेत. त्यामुळे बॉम्बस्फोटावेळी दाऊद भाजपचा अध्यक्ष होता असे म्हणायचे का, असा सणसणीत टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज लगावला आहे. –
ललित पाटील हा अटके वेळी शिवसेनेचा नाशिक शहर अध्यक्ष असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावर पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी फडणवीसांना टोला लगावला.