आरक्षण मिळाले तर आनंदच होईल!- शरद पवार

24 प्राईम न्यूज 23 Oct 2023
जरांगे-पाटील आणि सरकारमध्ये काही सुसंवाद झाल्याचे व सरकारने वेळ घेतल्याचे दिसते. याबाबत सरकार काय करते आहे, याकडे आमचे लक्ष आहे. या दोन दिवसांनंतर सरकारची भूमिका स्पष्ट होईल, असे दिसत आहे. यातून मार्ग निघाला आणि मराठा समाजाला आरक्षण मिळाले, तर आम्हाला मनापासून आनंद होईल, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. त्यानंतर शरद पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. “ज्यांना स्वतःचा पक्ष तिकीट देण्यायोग्य समजत नाही. त्यांनी बारामतीची चर्चा करण्याचे काहीही कारण नाही. त्यांना भाजपने तिकीट नाकारले, त्यामुळे त्यांच्याबाबत काही बोलू नये, अशी बोचरी टीका पवार यांनी केली. “सध्या निवडणुका लागलेल्या पाच राज्यांमध्ये लोक भाजपला बाजूला करतील, असे चित्र आहे. सध्या बदल करण्याची भावना देशामध्ये आहे. देशातील ७० टक्के राज्यांमध्ये भाजप नाही अन् जिथे या निवडणुका आहेत या निवडणुकींचा कौल भाजपच्या विरोधात असल्याचे दिसते, ” असेही पवार यांनी म्हटले.