शहापूर रस्त्यावर वाळूचे डंपर पकडले, मारवड पोलिसांची कारवाई…

अमळनेर/प्रतिनिधि
अमळनेर तालुक्यातील शहापूर शिवारात वाळू वाहून नेणारे डंपर मारवड पोलिसांनी पकडले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक २१ रोजी रात्री नऊ वाजता तालुक्यातील शहापूर ते कळमसरे रस्त्यावर वाळू वाहतूक करणारे डंपर मारवड पोलिसांच्या पथकाला मिळून आले. सदर चालकाकडे कोणताही परवाना नसल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी सदर डंपर व दोन ब्रास वाळू असा दोन लाख पाच हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून मारवड पोलीसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ किशोर पाटील हे करीत आहेत.