सोयगाव तालुक्यात तीन गावात राजकिय नेत्यांना गांवबंदी; सकल मराठा समाज आक्रमक

सोयगाव/साईदास पवार
मराठा आरक्षणाचा प्रश्नावर सोयगाव तालुक्यात सकल मराठा समाज सोमवारी आक्रमक झाला असून गावात येणार असाल तर आरक्षणाचा अध्यादेश घेऊन या असा थेट तीन गावांनी स्थानिक राजकिय नेत्यांना इशारा दिला आहे त्यामुळे आता सोयगाव तालुक्यात जरंडी, निमखेडी आणि उमर विहिरे या तीन गावात राजकिय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे दरम्यान सोयगाव च्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या जरंडी गावातही हा निर्णय घेतल्याने राजकिय नेत्यांच्या भुवया आता उंचावल्या आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नावर अद्यापही शासनाने निर्णय घेतलेला नाही त्यामुळे सकल मराठा समाज सोयगाव तालुक्यात आक्रमक झाला आहे अनेक गावांत आगामी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी गावागावात बैठका घेतल्या जात आहे तर जरंडी गावात रविवारी रात्री नऊ वाजता झालेल्या बैठकीत गावात मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊन येणार असाल तर जरंडीत पाय ठेवा असा निर्णय घेण्यात येऊन राजकिय नेत्यांना गावात तूर्तास प्रवेशबंद करण्यात आला आहे सोयगाव तालुक्यात पहिला निर्णय जरंडी गावाने घेतला आहे तर सोमवारी निमखेडी आणि उमर विहिरे या दोन गावात मराठा समाजाच्या वतीने बैठका घेवुन नेत्यांना गांवबंदी चा इशारा देण्यात आला आहे सोयगाव तालुक्यात गावागावात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी बैठका घेऊन आगामी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आगामी काळात घेण्यात येणारे उपोषण साखळी उपोषण आणि गांवबंदी यावर निर्णय घेण्यात येत आहे…..तालुक्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या जरंडी गावात राजकीय नेत्यांना गांवबंदी झाल्याने सर्वच पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे…..