उपक्रमशील मनोहर महाजन सर यांना “समाज भूषण पुरस्कार…….

अमळनेर /प्रतिनिधी
अमळनेर येथील संत सावता माळी माळीवाडा येथे
क्षत्रिय माळी समाज अमळनेर चे अध्यक्ष व लोकमान्य विद्यालय अमळनेर चे प्र.मुख्याध्यापक, उपक्रमशिल कलाशिक्षक श्री.मनोहर भगवान महाजन सर यांना सामाजिक मुखपत्र”माळी भुषण यांच्या कडुन दिला जाणारा मानाचा समाज भुषण पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.मनोहर महाजन सर क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ (महाराष्ट्र,मध्य प्रदेश, गुजरात)या मंडळात वीस वर्षांपासून कार्यकारिणी सदस्य आहेत, क्षत्रिय काच माळी समाज अमळनेर या मंडळावर तीस वर्षा पासुन पदाधिकारी असुन अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहेत संत सावतामाळी सेवा मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक असुन त्या माध्यमातून सतत समाजसेवेच्या कार्यात सक्रिय असतात.समाज संघटन, शिक्षण, पर्यावरण, अश्या त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत.त्यांना माजी आमदार मा.दादासाहेब शिरिष चौधरी,मा.श्री.भरतभाई माळी,मा.नगराध्यक्ष, तळोदा,मा.ज्ञानेश्वर महाजन,मा.नगराध्यक्ष, धरणगाव,मा.श्री.नानाभाऊ महाजन जि.प.सदस्य, जळगाव,मा.श्री.बाळासाहेब कर्डक, प्रदेशाध्यक्ष,अ.भा.महात्मा फुले समता परिषद,मा.श्री.शालिग्राम मालकर , प्रदेशाध्यक्ष, माळी महासंघ,मा.श्री.सतिष महाजन, जिल्हाध्यक्ष,समता परिषद,मा.रावसाहेब,सुदामजी महाजन,मा.श्री.ए.के.गंभीर सर अध्यक्ष-क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ,मा.प्राचार्य-प्रकाशजी महाजन,मा.श्री.भिमराव महाजन, संपादक, मासिक माळी भुषण यांच्या हस्ते समारंभपूर्वक सपत्नीक,श्री.मनोहर महाजन व सौ.रंजना महाजन यांना प्रदान करण्यात आला.समाज भुषण पुरस्कार मिळाल्या बद्दल मनोहर महाजन सर यांचे समाज स्तरावर अभिनंदन होत आहे….