अमळनेरात बौद्ध समाजातील गुणवंतांचा होणार सन्मान….
गुणवंतांनी नावे पाठवण्याचे आवाहन..

0

अमळनेर/ प्रतिनिधि

अमळनेर तालुक्यातील गुणवंतांचा सन्मान दिनांक 7 नोव्हेंबर विद्यार्थी दिनी म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिनी होणार असून त्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांनी आपली नावे पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यश संपादन केले असते त्यांचे अनेक ठिकाणी सन्मान देखील होत असतात. त्याच प्रमाणे त्यांचा त्यांच्या समाजाकडूनही सन्मान व्हावा म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात 10वी व 12वी वर्गात 70 किंवा 70 पेक्षा जास्त टक्के मिळवलेले विद्यार्थी, इतर कुठल्याही पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमात उत्तम श्रेणीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, चांगल्या गुणांनी व्यावसायिक पदवी मिळवलेले विद्यार्थी, मागील 2 वर्षात नौकरीला लागलेले विद्यार्थी व स्वतःचा व्यवसाय उभा केलेले तरुण अशांचा सन्मान होणार असून त्यांनी आपली नावे 7796112894 व 92846 15026 या क्रमांकांवर लवकरात लवकर पाठवावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!