एकदा जातनिहाय जनगणना होऊनच जाऊद्या – अजित पवार

24 प्राईम न्यूज 24 Oct 2023 उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आता जातनिहाय जनगणनेचा आग्रह घरला आहे. बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही एकदा जातनिहाय जनगणना होऊनच जाऊद्या. त्यातून राज्यातील ओबीसी

, मागासवर्गीय, आदिवासी, भटके विमुक्त, अल्पसंख्याक आणि खुल्या वर्गाची नेमकी आकडेवारी कळेल. यासाठी काही हजार कोटी खर्च झाले तरी चालतील, पण या आकडेवारीनुसार त्या त्या जातींच्या संख्येच्या प्रमाणात त्यांच्या विकासासाठी आर्थिक तरतूद करता येईल, असे मत अजित पवार यांनी व्यक्तअजित पवारांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महायुती सरकार सकारात्मक असल्याचा पुनरुच्चारही केला. सध्या ओबीसीचे ५२ टक्के आणि आर्थिक मागासवर्गाचे २० टक्के याप्रमाणे ६२ टक्के आरक्षण आहे. या ६२ टक्के आरक्षणाला धक्का न लागू देता उर्वरित ३८ टक्क्यांतून मराठास माजाला कसे आरक्षण देता येईल, यासाठी सरकार सकारात्मक आहे.