माजी सैनिक कॉलनी येथे आ.फारुख शाह यांचेहस्ते रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ..

धुळे/अनीस खाटीक
धुळे -आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत धुळे महानगरपालिका क्षेत्रात प्रभाग क्रमांक १ मध्ये माजी सैनिक कॉलनी सैनिक येथे सुमारे 25 लक्ष खर्चातून रस्ते कॉंक्रिटीकरण करणे या कामाचा शुभारंभ आ. फारुख शाह यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन जेष्ठ माजी पत्रकार महेश घुगे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर दीपश्री नाईक डॉक्टर गिंदोडिया गनी डॉलर कैसर अहमद यांची उपस्थिती होती.यावेळी देविदास कुलकर्णी ,एडवोकेट निलेश कुलकर्णी, जिजाबराव पवार ,पंडित वानखेडे, चिंतामण पाटील, रविकांत खंडारे, सुनील पाटील, भारत मराठी, प्रवीण पाटील, नरेश पाटील आदी उपस्थित होते.