आमचं सरकार आल्यावर तुम्हाला उलटं टांगू; उद्धव ठाकरेंचा पलटवार..

24 प्राईम न्यूज 25 Oct 2023 जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवाने, 57 वर्षानंतरही शिवसेनेन दसरा मेळाव्याची परंपरा तोडलेली नाही. ज्यांनी आमचा नाश करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा नाश करून आम्ही पुढे जात आहोत. आमच्या मेळाव्यानंतर आम्ही खोका
सुराचे दहन करू, रामाने रावणाचा वध का केला? कारण मी ऐकले आहे की रावण देखील शिवभक्त होता. तरीही सवण वेडा झाल्यामुळे रामाला त्याचा वध करावा लागला. रावणाने सीतेचं अपहरण केलं होते. तसंच आमच्या शिवसेनेला पळण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांवर टीका केली.

आमच्या नादाला लागू नका
आमच्या नादाला लागू नका, असा इशारा ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलाय. मराठा आरक्षणासाठी आंतरवली सराटी गावात पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यात अनेक जण जखमी होते. मराठा नेते मनोज जरांगे यांनी शांततेत आंदोलन सुरू ठेवलय. त्यांनी आज धनगरांनापण साद घातली आहे. मात्र, सरकारने जालियनवाला बाग हत्याकांडासारखी परिस्थिती निर्माण केली होती. मीही मुख्यमंत्री होतो. मात्र, मी कधीही लाठीहल्ल्याचा आदेश दिला नाही. जालन्यातील लाठी हल्ल्याचा जनरल डायर कोण आहे? असा सवाल त्यांनी राज्य सरकराला केला. आरक्षणाचा निर्णय संसदेत घ्या गद्दारामध्ये हिम्मत असेल तर त्यानी मराठयांना आरक्षण द्यावे, असं देखील उद्भव ठाकरे यांनी म्हटलंय. मराठा आरक्षणाचा निर्णय संसदेत घ्यावा. तुम्ही कितीही माझ्यावर टीका केली तरी मी तुम्हाला उत्तर देत नसल्याचं ठाकरे यांनी म्हटलंय, भाजपा समाजात भांडण लावण्याचा डाव करत असल्याचा आरोप देखील उद्धव ठाकरे यांनी केलाय. मात्र, मनोज जरांगे यांनी सरकारचा डाव वेळीच ओळखल्याचंही ते म्हणाले,