उद्धव ठाकरे हे महागद्दार आहेत, त्यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला. -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

24 प्राईम न्यूज 25 Oct 2023 आम्ही हिंदुत्वासाठी सत्ता सोडली, हे सत्तेसाठी लाचार झाले. त्यांची बांधिलकी फक्त पैशाशी आहे. बाळासाहेबांनी ज्यांना आपल्याजवळ उभं करून घेतलं नाही त्यांच्यासोबत हे आज गेले. आम्हाला ‘एक फूल, दोन हाफ’ म्हणणारे हे ‘एक फुल, एक हाफ’ कधीही आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, हे कळणार नाही. उद्धव ठाकरे हे महागद्दार आहेत, त्यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
आझाद मैदानावर शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंनाच प्रमुख लक्ष्य केले. “रक्ताचे नाते सांगणाऱ्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा गळा घोटला. त्यांची बांधिलकी फक्त पैशांशी. आपल्याला शिवसेना आणिधनुष्यबाण अधिकृतपणे दिल्यानंतर शिवसेनेच्या खात्यातील ५० कोटी रुपये त्यांनी बँकेकडे मागितले. बँकेने नकार दिला. बँक म्हणाली, निवडणूक आयोगाने शिवसेना एकनाथ शिंदेंना दिली आहे. त्यांनी निर्लज्जपणे आम्हाला पत्र पाठवले. तुम्ही आमच्यावर ५० खोक्यांचा आरोप करता आणि ५० खोके आमच्याकडे मागता. या एकनाथ शिंदेनी क्षणाचाही विलंब न लावता ५० कोटी द्यायला लावले. त्यांना खोके नव्हे तर कंटेनर पाहिजे, त्यांना जवळून ओळखणारे सांगतात. त्याचा एक साक्षीदार मी असून त्याविषयी योग्य वेळेला बोलेन, अशी टीकाही त्यांनी केली.