ओबीसीतील मोठा भाऊ म्हणून माळी समाज रस्त्यावर उतरला नाही तर भविष्यातील पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत-
सेवानिवत्त तहसिलदार सुदाम महाराज..

0

अमळनेर/प्रतिनिधी
ओबीसींच्या आरक्षणाला बाधा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. ओबीसींच हे आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी सर्व ओबीसी घटकांना एकत्रित करून जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. यासाठी ओबीसी तील मोठा भाऊ म्हणून माळी समाजाने पुढाकार घ्यावा, ओबीसीच आरक्षण कायम ठेवण्यासाठी सर्व ओबीसी घटकांनी एकजूट ठेऊन आपला सहभाग कायम ठेवावा असे प्रतिपादन सेवानिवृत्त तहसीलदार सुदाम महाजन म्हणाले.
राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ ,महाराष्ट्र माळी समाज महासंघ,क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ (महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात) केंद्रीय माळी समाज सुधार मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली आज अमळनेर येथे माळी समाज ओबीसी आरक्षण निर्धार मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश अध्यक्ष शालिग्राम मालकर यांनी मनोगत मनोगत व्यक्त करता सांगितले की माळी समाज हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा समाज असून,पण पोट जातींमध्ये विभागलेला आहे या सर्व पोट जाती एकत्र करून ओबीसी समाजाचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या मागे पूर्ण ताकदीने समाज उभा करावा लागेल. सांख्यिक दहशतवादाचे उत्तर सांख्यिक दहशतवादानेच द्यावे लागेल असे मत यावेळी व्यक्त केले.
यावेळी माजी आमदार शिरिष दादा चौधरी यांनी यांनी भुजबळ साहेब यांच्यामागे ओबीसी समाजाची ताकद उभी करू असे सांगितले तसेच सुधारणा मंडळाचे अध्यक्ष प्रा. ए के गंभीर यांनी ओबीसी समाजाला आपली दिशा काय असायला हवी यासाठी यासाठी पंच सुत्री सांगितली.

यावेळी माळी समाजाचे नेते माजी नगराध्यक्ष भरत बबनराव माळी तळोदा, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, माजी आमदार शिरीष दादा चौधरी, जि प सदस्य नानाभाऊ पोपट महाजन, महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर, सुधारणा मंडळाचे अध्यक्ष ए के गंभीर,सेवानिवृत्ती तहसीलदार सुदाम महाजन , समता परिषदेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख अनिल नाळे, केंद्रीय माळी समाज सुधार मंडळाचे बाबुराव घोंगडे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सतीश महाजन, निळकंठ महाजन आदी उपस्थित नगरसेविका संध्या महाजन चोपडा, नगरसेवक बापू महाजन पारोळा, अनिल माळी तळोदा, सुनील महाजन धुळे हनुमत महाजन अडावद, सचिन महाजन, किशोर महाजन धानोरा, संजय महाजन धानोरा, महाजन धानोरा महेंद्र महाजन किनगाव, किरण माळी सर दहिवद, प्रवीण महाजन दहिवद, सुधाकर महाजन पिंपली, रवींद्र महाजन पिंपली, बापूराव महाजन शिरूर सुरेश महाजन चोपडा शंकर महाजन लासुर, एन डी माळी, आय आर मगरे सर तळोदा, प्रकाश महाजन उल्हासनगर, डॉ भावना महाजन लासुर ,रेखा महाजन मुंबई, रोहिणी महाजन मुंबई, मंगलाताई महाजन अमळनेर,अलकाताई महाजन खर्ची, उत्तम महाजन , गंगाराम निंबा महाजन, अमळनेर गणेश शंकर महाजन ,देविदास भगवान महाजन अमळनेर ,अमळनेर, आत्माराम देबचद शिरपूर, चंद्रकांत ताराचंद महाजन शिरपूर, रवींद्र महाजन शिरपूर कैलास महाजन पारोळा ,रवींद्र महाजन पारोळा, संजय महाजन, दिपक महाजन पुणे,लीलाधर महाजन पुणे,संत सावता माळी युवक संघाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन, महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रा.नितीन चव्हाण, समता परिषदेचे अध्यक्ष प्रताप पाटील, माळी समाज सुधारणा मंडळाचे सहसचिव संजय महाजन अडावद. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव महाजन यास संपूर्ण परिसरातील ओबीसी समाज बांधव समता सैनिक समता सैनिक महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते क्षत्रिय माळी समाज पंच मंडळ सदस्य संत सावतामाळी सेवा मंडळ भाजी मार्केटचे कार्यकारी सदस्य व पदाधिकारी क्रांतीज्योती महिला मंडळ अमळनेरचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित


यांच्या झाला सन्मान
यावेळी माळी समाज भूषण पुरस्काराने खालील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले त्यात प्रा. प्रकाश संतोष माळी मुंबई, श्री लीलाधर मोतीलाल मगरे पुणे, उखाभाऊ गणपत पिंपरे तळोदा, विवेक एकनाथ जाधव पहुर, मनोहर भगवान महाजन अमळनेर, बाबूलाल भिका महाजन शिरपूर, आनंदा महाजन पारोळा, योगेश भागवत बनकर पहुर, विठ्ठल नारायण गीते पिंपळगाव हरेश्वर,मोतीलाल गणपत माळी भोजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!