माळेगाव पिंप्री ग्रामपंचायत साठी सदस्य पदासाठी सहा जणांची माघार; सदस्य पदासाठी आठ व सरपंच पदासाठी दोन दहा उमेदवार रिंगणात..

सोयगाव/साईदास पवार
सोयगाव, ता.२५…माळेगाव पिंप्री ग्रामपंचायती साठी सदस्य पदाच्या सात जागांपैकी

तीन जागांसाठी सहा जणांनी बुधवार (ता.२५) ,माघार घेतल्या मुळे सदस्य पदांच्या चार जागांसाठी आठ तर सरपंच पदासाठी दोन उमेदवार रिंगणात आहे त्यामुळे माळेगाव पिंप्री ग्रामपंचायत च्या देवकाबाई बोखारे प्रमोद एकनाथ कोल्हे छोटू परदेशी हे तीन जण बिनविरोध झाले असून थेट जनतेतून सरपंच पदासाठी कल्याणी पाटील व साधना परदेशी यांच्यात सरळ लढत होत आहे
माळेगाव पिंप्री ग्रामपंचायत च्या सदस्य पदाच्या सात जागांपैकी तीन जागांसाठी सुपडू पाटील,मंजुळा बाई बोरसे, शिलाबाई पाटील,पुंडलिक पाटील,अमोल पाटील आणि देवकाबाई गवळी या सहा जणांनी उमेदवारी अर्ज माघार घेतले आहे त्यामुळे सदस्य पदाच्या तीन जागा बिनविरोध झालेल्या आहे तर सदस्य पदासाठी चार जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात असुन सरपंच पदासाठी दोन उमेदवार सरळ लढत होत आहे रिंगणात असलेले उमेदवार खालील प्रमाणे
सरपंच पदासाठी थेट जनतेतून निवड होत आहे त्यामुळे साधनाबाई परदेशी व कल्याणी पाटील यांच्या मध्ये सरपंच पदासाठी लढत होत आहे सदस्य पदासाठी शालीग्राम साळवे नितीन सोनवणे ,प्रतिभा पाटील,सरलाबाई पाटील,अवंताबाई जाधव जिजाबाई जाधव, सुनीताबाई जाधव ,अनिता मोरे हे आठ उमेदवार सदस्य पदासाठी रिंगणात असून एक हजार २९ मतदार मतदानाचा हक्क बजावनार आहे दरम्यान प्रभाग एक मधून प्रमोद कोल्हे,सर्वसाधारण महिला प्रवर्गात देवकाबाई बोखारे यांची सदस्य पदी बिनविरोध निवड झाली तर प्रभाग दोन मधून छोटू परदेशी हे बिनविरोध निवडून आले आहे पिंप्री गावचे दोन सदस्य बिनविरोध होताच संजय पाटील गजानन कोल्हे संजय बारवाल शिवाजी पाटील भागवत अपार रणजित परदेशी बबलू पाटील कृष्णा पाटील संग्राम परदेशी कृष्णा कोल्हे अमर सिंग परदेशी कैलास मरमट बाबुराव बोरसे आदींनी जल्लोष केला.. तहसीलदार मोहनलाल हरणे निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार हेमंत तायडे आदींच्या मार्गदर्शनाखाली विजय कोळी सचिन ओहोळ मोतीराम जोहरे फिरोज तडवी अमोल गायकवाड आदींनी उमेदवारांना चिन्हे वाटप केली….