एरंडोल येथे महाजन नगरात घराचा कडी कोंडा व कुलूप तोडून ३९ हजार पाचशे रुपयांचा एवज लंपास

एरंडोल(प्रतिनिधी) येथे महाजन नगरा मधील रमेश सिंग अर्जुन सिंग चौधरी हे सेवानिवृत्त इसम ५ डिसेंबर रोजी घराचे दरवाजाला कुलूप लावून मुंबई व पुणे येथे गेले १० जानेवारी २३ रोजी ते एरंडोल येथे परतले असता घराचा कडी कोंडा व कुलूप तुटलेले दिसले. व घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यावरून घरात चोरी झाल्याचे लक्षात आले एकूण ३९ हजार पाचशे रुपयाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचा आढळून आला.
याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला अज्ञात छोट्याविरुद्ध पुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास एरंडोल पोलीस स्टेशन करीत आहे