विलास मोरे यांचा पुरस्काराचा चौकार . ” पांढरे हत्ती काळे दात ” या कादंबरीला चवथा पुरस्कार जाहीर .

एरंडोल/ कुंदन ठाकुर
रेंदाळ , जि. कोल्हापूर येथिल

कविवर्य ए. पां. रेंदाळकर वाचनालयाच्या वतीने २०२२ सालासाठी प्रतिष्ठेचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार एरंडोल येथील साहित्यिक अॅड. विलास कांतीलाल मोरे यांच्या ” पांढरे हत्ती काळे दात ” या कादंबरीला जाहीर करण्यात आला . रोख रक्कम रुपये तीन हजार आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कथा, कविता , कादंबरी या साहित्य पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील सुमारे दीडशेहून अधिक लेखक- कवींनी आपली पुस्तके पाठविली होती.
पुरस्काराचे हे सहावे वर्ष असून
या पुरस्कार निवड समितीत डॉ. रफीक सूरज, डॉ. गिरीश मोरे आणि डॉ. गोपाळ महामुनी यांनी काम पाहिले. पुरस्कार वितरण समारंभाची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल असे वाचनालयाचे अध्यक्ष श्री. आर. एम. पाटील (सर) यांनी जाहीर केले आहे. साहित्यिक योगदानाबद्दल यावर्षी ज्येष्ठ लेखिका नीलम माणगावे आणि नव्या पिढीतील आश्वासक कवी-लेखक एकनाथ पाटील या दोघांची देखील निवड करण्यात आली आहे.
अॅड . विलास मोरे यां

ना त्यांच्या याच कादंबरीला यापूर्वी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार २०२२ , महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जामनेर यांचा प्राचार्य किसनराव पाटील स्मृती पुरस्कार , 2022 , नायगाव , नांदेड येथील केवळ बाई मिरेवाड स्मृती पुरस्कार 2022 प्राप्त झालेले आहे . एकाच कादंबरीला मिळालेला या वर्षाचा हा चवथा पुरस्कार असून साहित्य वर्तुळातून “पांढरे हत्ती काळे दात ” या कादंबरीची जोरदार चर्चा सुरू आहे . ही कादंबरी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम . ए . ला अभ्यासक्रमात दुसऱ्या सत्रात समाविष्ट करण्यात आली आहे . विलास मोरे यांना यापूर्वी महाराष्ट्र शासनाचा “बालकवी” पुरस्कार देखील मिळालेला आहे . त्यांची कथा . कविता ,कादंबरी, बालकविता ,बालकथा .बालकादंबरी, बालनाट्य ,या विविध प्रकारातील एकूण सोळा पुस्तके प्रसिद्ध झाली असून नुकताच रिलीज झालेला आधारवड चित्रपटात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे .
हा सन्मानाचा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे वांङ्मयीन क्षेत्रात विविध स्तरावरून अभिनंदन केले जात आहे . यांत प्रा . डॉ . म .सु. पगारे जळगाव , रमेश पवार व प्रा . डॉ . रमेश माने अमळनेर , अशोक कोळी जामनेर , सतिष जैन नाशिक, डॉ . मिलींद बागुल , अॅड मोहन बी शुक्ला , प्रा . डॉ . सत्यजीत साळवे , प्राचार्य डॉ . एस आर पाटील धुळे , प्रा . वा.ना. आंधळे , शशिकांत हिंगोणेकर, रविंद्र मोराणकर यांनी अभिनंदन केले आहे .